विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : सणांच्या काळात मुस्लिम व्यापाऱ्यांना मंदिराच्या आवारात जाण्यास बंदी घालण्याच्या मंदिर प्राधिकरणाच्या निर्णयावर कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आमदार विश्वनाथ यांनी दिला आहे. हे भाजपचे सरकार आहे, बजरंग दल, आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) किंवा काही गटांचे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.This is the BJP government, not Bajrang Dal, RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) or any other group, the BJP MLA critisies own government
उडुपी, दक्षिण कन्नड आणि शिवमोगा जिल्ह्यांतील मंदिरांच्या बाहेर बॅनर लावण्यात आले असून मुस्लिम व्यापाºयांना धार्मिक मेळ्यांमध्ये स्टॉल लावण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्यामध्ये म्हटले आहे. हिंदूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही लोकांना उत्सव आणि पवित्र प्रसंगी मंदिराच्या परिसरात परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे या कायद्याच्या समर्थनार्थ म्हटले आहे.
यावर विश्वनाथन यांनी टीका केली आहे. विश्वनाथ यांनी गोकाक येथे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का विकास आणि विश्वास’ असा संदेश दिला आहे. पण आपले राज्य चुकीच्या दिशेने चालले आहे. देशात इतत्रही मुस्लिम राहतात.
हे मुस्लिम अन्न आणि फुले विकतात. काय फरक पडतो? ते फक्त व्यापारी लोक आहेत. ते काय खातील? हिंदू, मुस्लिम – काही फरक पडत नाही. रिकाम्या पोटाचा प्रश्न आहे. सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. आपण हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला आहे.
This is the BJP government, not Bajrang Dal, RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) or any other group, the BJP MLA critisies own government
महत्त्वाच्या बातम्या
- पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न, संतप्त जमावाची आरोपी मौलानाला बेदम मारहाण, कपडे फाडून धिंडही काढली
- बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरने ७०० अमेरिकन नागरिकांची केली फसवणूक आठ जणांना अटक
- Modi – Patole : पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाना पटोलेंचा आक्षेपार्ह वक्तव्ये; कारवाईचे दिलीप वळसेंचे आश्वासन!!
- जेसीबी खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित