विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातले मोदी सरकार बहुमत असूनही आर्थिक सुधारणांच्या दिशेने सावधगिरीने पावले टाकत असल्याच्या असल्याच्या आशंका रिफॉर्मिस्ट अर्थशास्त्रज्ञ घेत असतात. मात्र त्यांच्या या आशंकांना मॉर्गन स्टॅनले रिसर्च रिपोर्टने छेद दिला आहे. मॉर्गन स्टॅनले रिसर्चने भारतातले 10 बदल नेमकेपणाने टिपले असून “हा” 2013 चा भारत उरलेला नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. भारतात गेल्या 10 वर्षांमध्ये झालेल्या आर्थिक बदलांना मॉर्गन स्टॅनले रिसर्चने नेमकेपणाने टिपले आहे. त्यासाठी त्यांनी 10 निकष लावले होते. त्याचे निष्कर्ष ही त्यांनी मांडले आहेत. This India is different from what it was in 2013 Morgan Stanly
यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि बाजार, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजार त्याला अर्थव्यवस्थेने दिलेला प्रतिसाद, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान आदी निकषांवर भारत पुढे सरकल्याचे हा रिसर्च रिपोर्ट मांडतो. मॉर्गन स्टॅनले गुंतवणूक क्षेत्रातील मोठी सल्लागार कंपनी मानली जाते. व्यक्तिगत गुंतवणुकीपासून ते संस्थात्मक गुंतवणुकीपर्यंत अनेकांना कंपनीने दिलेले सल्ले त्यांच्या सकारात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरल्याचे कंपनीच्या वेबसाईटवर नमूद केले आहे.
अनेक परकी गुंतवणूकदार भारताच्या आर्थिक सुधारणांच्या वेगाविषयी शंका घेतात. पण तरी देखील या शंका ओलांडून भारताने जगात दुसऱ्या क्रमांकाने वाढत चाललेली अर्थव्यवस्था ही कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या 25 वर्षांत भारतीय शेअर बाजाराची कामगिरी जागतिक पातळीवर सातत्याने उंचावलेली राहिली आहे. 2014 नंतर भारतीय शेअर बाजाराचा आलेख अधिक उंचावलेला दिसतो, याकडे मॉर्गन स्टॅनले रिसर्च रिपोर्ट लक्ष वेधतो.
मॉर्गन स्टेनलेच्या उपाध्यक्षांनी भर रस्त्यात पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले
सप्लाय साईड मध्ये सुधारणा अर्थव्यवस्थेचे फॉर्मलायझेशन, रियल इस्टेट मध्ये अधिनियम आणि सुधारणा सोशल ट्रान्सफर डिजिटल, दिवाळखोरी कोड मध्ये बदल, परकी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित, चलनवाढ रोखण्यात यश, इज ऑफ डूइंग बिजनेस कॉर्पोरेट कर रचनेत सुधारणा, पायाभूत सुविधा सुधारणेला अनेक पटींनी वेग, 401K मोमेंट या निकषांवर भारत अतिशय वेगाने पुढे सरकली, असे मॉर्गन स्टॅनलेने रिसर्च रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
गेल्या 10 वर्षात कॉर्पोरेट कर भारताने 25 % च्या खाली ठेवण्यात यश मिळवले आहे, तर नव्या कंपन्यांसाठी तो 15 % च्या आसपास आहे.
पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय राजमार्ग, ब्रॉडबँड सबस्क्राईबवर आधार, ग्रीन टेक्नॉलॉजी वापर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण यात भारताने आघाडी घेतली आहे. भारताचा डिजिटल व्यवहार जीडीपीच्या 76 % पर्यंत वाढला आहे. जागतिक पातळीवर विकसित देशांमध्ये आर्थिक मंदीची चाहूल लागली असताना देखील भारताची आर्थिक वाढ थांबण्याची चिन्हे नाहीत, असा दृढ विश्वासही मॉर्गन स्टॅनलेने व्यक्त केला आहे.
This India is different from what it was in 2013 Morgan Stanly
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- महाराष्ट्रात 95000 कोटींची गुंतवणूक येणार; नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणास शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता
- मोदी सरकारच्या ९ वर्षांत देशाच्या संरक्षण निर्यातीत तब्बल २३ पटीने वाढ, ८५ देशांना विकली शस्त्रास्त्रे!
- मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगदा खोदण्याचा अखेरचा टप्पा पूर्ण