• Download App
    महिला उद्योजिकेने अथक प्रयत्नानंतर पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा व्यवसाय नेला ५० कोटी रुपये इतका.|This entrepreneur powers her pet product bonaza to 50 crore despite 200 rejections

    महिला उद्योजिकेने अथक प्रयत्नानंतर पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा व्यवसाय नेला ५० कोटी रुपये इतका.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्लीमध्ये राहणाऱ्या राशी नारंग यांचे आयुष्य पाळीव प्राण्यांबरोबर लहानपणापासूनच गेले.इंग्लंडमधून शिकून लग्न झाल्यानंतर २००६ त्या भारतात परत आल्या. सारा नावाची लॅब्रॅडॉर पप भेट मिळाली. त्या म्हणाल्या, मला याचा खूप आनंद झाला, मी माझा बराच वेळ तिच्यासाठी घालवत असे.This entrepreneur powers her pet product bonaza to 50 crore despite 200 rejections

    या काळात माझ्या लक्षात आले की बाजारात यासाठी उपलब्धता कमी आहे. त्या म्हणाल्या “पेट साठी साबण, कॉलर, बेड चांगले हवे असायचे पण बाजारात फार कमी व्हरायटी उपलब्ध होती.” तसेच जे अन्न मिळत असे त्यात कोणते प्रिझर्वेटीव आहेत ते कळत नसे. स्वच्छतेसाठी पण विशेष उत्पादने उपलब्ध नव्हती.



    त्यांनी स्वतःच पेट्स साठी उत्पादन बनवायला सुरुवात केली आणि Heads Up for Tails या कंपनीची स्थापना केली. २००८ मध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्या म्हणाल्या की, पाळीव कुत्र्यांना बंद राहणे आवडत नाही आणि फिरताना इकडे तिकडे हुंगत असतात. त्या म्हणाल्या “मी त्यांच्या प्रकाराप्रमाणे जाकीट बनवली, त्यांना नीट खाता येईल अशी भांडी बनवली आणि त्यांना हानी न पोहचवणारे साबण बनवले. पण दुकानदार घेत नव्हते व त्या वस्तू विकल्या जाणार नाहीत असे म्हणत. दोनशे पेक्षा जास्त दुकानात माल खरेदी साठी नकार मिळाला.

    दुकानदार स्वतः प्राणी पाळणारे नसल्याने त्यांना प्राण्यांच्या गरजा कळत नसत व एक व्यवसाय म्हणूनच याकडे बघत असत. नंतर त्यांनी सणांच्या निमित्ताने प्रदर्शने भरवणे चालू केले आणि त्याचा परिणाम होऊ लागला.

    लोक त्यांना काय हवं ते सांगू लागले. पाणी पिण्यासाठी बाऊल, केमिकल फ्री फुड असे बनवू लागले. आणि हळूहळू १०० उत्पादने झाली. नंतर पती सिंगापूरला कामाला गेले. तेथे त्यांनी वेबसाईट चालू केली व दहा लोक काम करत होते.

    सहा वर्षांनी भारतात परत आल्यावर एका सिंगापूर येथील गृहस्थाने १ मिलियन डॉलर गुंतवणूक केली. यामुळे उत्पादनात वाढ झाली आणि २०१७ मध्ये २.६ मिलियन डॉलर गुंतवणूक मिळाली. HUFT ही कंपनी आज महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील ९ शहरात ४१ स्टोअर्स, ५००० उत्पादने व २० डॉग स्पा सह कार्यरत आहे.

    त्या म्हणाल्या की, साराज ट्रिट हे उत्पादन प्रसिद्ध आहे. ते चांगले प्रतीचे पदार्थ वापरून व प्रिझर्वेटिव मुक्त असे बनवले आहे. बिशम लिलाराम म्हणाले की, मी २००९ पासून यांचा ग्राहक आहे. ते म्हणतात की ‘HUFT’ ची सर्व उत्पादने प्राण्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेली आहेत.

    राशी यांनी कोरोना काळात सॅनिटायझर बनवली जी खेळण्यांवर व पंजाना वापरता येतात. त्या म्हणाल्या की ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असते. मी त्यांच्या फिडबॅक व तक्रारीचा अभ्यास करते. माझ्या व्यवसाय शुन्यातून कोटींपर्यंत आणण्यासाठी याचा उपयोग झाला. शेवटी त्या म्हणाल्या की “आपण प्राण्याबरोबर राहणे भाग्याचे समजले पाहिजे आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. आपण त्यांच्या गरजा समजून त्यांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

    This entrepreneur powers her pet product bonaza to 50 crore despite 200 rejections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका