• Download App
    कोरोनाविरुध्द लढताना मृत्यूचे आकडे पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे. मात्र, जिद्दीने लढल्यास कोरोनावर मात करता येते हे लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींनी दाखवून दिले आहे.|This determination to fight against Corona will inspire us, the 105-year-old grandfather and 95-year-old grandmother from Latur overcame Corona

    कोरोनाविरुध्द लढण्याची ही जिद्द आपल्याला देईल प्रेरणा, लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात

    कोरोनाविरुध्द लढताना मृत्यूचे आकडे पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे. मात्र, जिद्दीने लढल्यास कोरोनावर मात करता येते हे लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींनी दाखवून दिले आहे. त्यांची लढण्याची जिद्द अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.This determination to fight against Corona will inspire us, the 105-year-old grandfather and 95-year-old grandmother from Latur overcame Corona


    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई: कोरोनाविरुध्द लढताना मृत्यूचे आकडे पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे. मात्र, जिद्दीने लढल्यास कोरोनावर मात करता येते हे लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींनी दाखवून दिले आहे. त्यांची लढण्याची जिद्द अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

    लातूर जिल्ह्यातील काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दांपत्याने वेळेवर उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.



    लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या आजी-आजोबाचा फोटो शेअर करत, ही आनंदाची बातमी दिली. सध्याच्या वातावरण कोरोना रुग्णांना धीर देणारी, त्यांचं मनोधैर्य वाढवणारी ही बातमी आहे.

    आजी-आजोबांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांचा मुलगा सुरेश चव्हाण यांनी रुग्णालयात दाखल केले. कोरोनासारख्या आजारातून कोणी बरे होत नाही, असे सांगून ग्रामस्थांनी त्यांना अडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, चव्हाण आजी-आजोबांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

    चव्हाण कुटुंबातील पाच जणांना २४ मार्च रोजी कोरोनाची लाग झाली होती. दोघांनाही खूप ताप होता. आजोबांना जीवघेणी पोटदुखी होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    आजोबांना ५ एप्रिल रोजी घरी सोडण्यात आले तर आजी त्यानंतर दोन दिवसांनी ठणठणीत बऱ्या होऊन घरी आल्या. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, वेळेत रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचबरोबर चांगल्या उपचारांमुळे प्रकृती सुधारण्यास मदत झाली.

    This determination to fight against Corona will inspire us, the 105-year-old grandfather and 95-year-old grandmother from Latur overcame Corona

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!