वृत्तसंस्था
बोस्टवाना : आफ्रिकेतील बोस्टवाना देशात जगातील तिसरा सर्वांत मोठा हिरा सापडला आहे. जगप्रसिद्ध हिरे कंपनी ‘द बिअर्स’चा एक भाग असलेल्या ‘देबस्वाना डायमंड’ या कंपनीला हा अनमोल हिरा सापडला असून त्याचे वजन एक हजार ९८ ग्रॅम कॅरेट आहे. Third largest diamond found in Bostwana
कंपनीच्या पाच दशकांच्या इतिहासात एवढा मोठा हिरा प्रथमच सापडला आहे. वॅनेंग या खाणीतून एक जूनला बाहेर काढलेला हा हिरा गुणवत्तेच्या आधरावर जगातील आतापर्यंतचा तिसरा मोठा हिरा आहे. त्याची लांबी ७३ मिलिमीटर आणि रुंदी ५२ मिलिमीटर आहे.
याआधी ‘कलिनन डायमंड’ हा तीन हजार १०६ कॅरेटचा हिरा १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. त्यानंतर जगातील दुसरा मोठा हिरा ‘लेसेडी ला रोना’ हा बोस्टवानामध्येच २०१५ मध्ये मिळाला होता. एक हजार १०९ कॅरेट वजन असलेला हा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा होता. या हिऱ्याचे मूल्यांकन डायमंड ट्रेडिंग कंपनीकडून काही आठवड्यांत केले जाणार आहे. या हिऱ्याचे नामकरण अद्याप केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
Third largest diamond found in Bostwana
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक, उपचारातील हलगर्जीपणामुळे मिरजेतील ८७ रुग्णांचा मृत्यू, अॅपेक्स हॉस्पीटलच्या प्रमुक डॉक्टरला अटक
- अनोखी प्रेमकहानी, मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांच्या लग्नासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती मध्यस्ती
- विजय मल्याचे शेअर्स विकून होणार ६,२०० कोटी रुपयांची वसुली
- देशाचे कायदे सर्वोच्च, तुमची धोरणे नाही, संसदीय समितीने ट्विटरला फटकारले
- ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कॉरोनामुळे निधन