• Download App
    मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर "कोणी" भरला? त्यांना काय करणार?? किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर!! । They say they will kill me in pairs, who paid the property tax of 19 bungalows? What will they do ?? Kirit Somaiya's reply to Sanjay Raut !!

    मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर “कोणी” भरला? त्यांना काय करणार?? किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात सुरू केलेल्या एपिसोडचा दुसरा अंक आज राजधानी नवी दिल्लीत पार पडला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना जोड्याने मारीन असे सांगत ज्या आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या, त्या सर्व आरोपांना किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. They say they will kill me in pairs, who paid the property tax of 19 bungalows? What will they do ?? Kirit Somaiya’s reply to Sanjay Raut !!

    किरीट सोमय्याला जोड्याने मारणार, असे म्हणतात. मग त्या 19 बंगल्यांचा मालमत्ता कर कोणी भरला आहे? त्याची सगळी माहिती मी मिळवली आहे. तो मालमत्ताकर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी भरला आहे. मग त्यांना काय करणार? असा खडा सवाल किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला आहे, इतकेच नाही तर पुढे जाऊन संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुन्नस काढत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

    संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल – भडवा असा उल्लेख केला होता. “कोलराई गावात १९ बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे की, कधीही सांगा आपण चार बसेस करु आणि १९ बंगल्यांमध्ये पत्रकारांची पिकनिक काढू. जर बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. जर दिसले नाहीत तर संपूर्ण शिवसेना किरीट सोमय्याला जोड्याने मारेल, असे संजय राऊत म्हणाले होते.

    किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर

    “किरीट सोमय्याला जोड्याने मारण्याच्या बाता मारतात. हे तर रश्मी ठाकरेंना संबोधून संजय राऊत बोलत आहेत. १९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला होता. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. इतकेच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. हा कर किरीट सोमय्याने भरलेला नाही. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात?, असा खडा सवा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    १ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे. ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे आणि व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. अन्वय नाईक यांनी २००८ मध्ये बांधले होते. हा ठाकरे सरकारनेच दिलेला रेकॉर्ड आहे. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या, असे किरीट सोमय्यांनी सांगितले.



    किरीट सोमय्या म्हणाले की, ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड गेल्या वर्षी मी मिळवले आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे. रश्मी ठाकरेंच्या नावाने घरे दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल २०१४ मध्ये करार केला. त्यात घरे असल्याचे पुरावे त्यांनी जोडले. ते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. महत्वाचे म्हणजे हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आले आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

    आता तुम्ही मीडियाला मी तुम्हाला, किरीट सोमय्यांना घेऊन जातो असं सांगत आहात, त्यापेक्षा रश्मी ठाकरे, मनिषा वायकर, मुख्यमंत्र्यांना घेऊन जा. हे खरे नसेल तर घरपट्टी कशाला भरत आहेत? याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही घरपट्टी भरण्यात आली आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

    उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर १२ नोव्हेंबर २०२० ला मालमत्ता कर भरल्यानंतर ते बंगले चोरीला गेले का? मुख्यमंत्र्यांचे बंगले चोरीला गेल्याची तक्रार मी पोलीस ठाण्यात दिली आहे. आता जाऊन मग बंगले नाहीयेत दाखवायचे नाटक कशाला? बंगले नाहीयेत हे मी वर्षभरापासून सांगत आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मनिषा वायकर यांनी बंगले असल्याचा आभास निर्माण करत कोटींची संपत्ती दाखवल्याचा आरोप मी नाही करु शकतं. अन्वय नाईक खोटारडेपणा करत होते असे मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे का?,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली.

    संजय राऊतांना उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल नील सोमय्याचा वापर कशाला करता? अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. थेट जाऊन मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला जाऊन मदत करत नसल्याचं सांगा. मी काढलेला घोटाळा संजय राऊतांनी पुन्हा एकदा समोर आणण्याचं कारण काय? मग जोड्याने किरीट सोमय्याला मारायचं आहे की तुमचा पक्ष, तुमचा घोटाळा यावरुन लक्ष हटवण्यासाठी आहे,” असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

     सोमय्यांवर आरोप काय?

    नील किरीट सोमय्या यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळय़ातील राकेश वाधवानशी संबंध आहे. देवेंद्र लाडानीच्या नावे सोमय्यांनी ४०० कोटी रुपयांची जमीन ४.५ कोटी रुपयांना घेतली. तसेच वाधवान याच्याकडून १०० कोटी रुपये वसूल केले. सोमय्यांच्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी नाही, असा आरोप करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती.

    They say they will kill me in pairs, who paid the property tax of 19 bungalows? What will they do ?? Kirit Somaiya’s reply to Sanjay Raut !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य