• Download App
    युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत 'ही' उत्तरे दिली होती | These answers got Dr. Apala Mishra Mishra to get highest score in UPSC interview

    युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत ‘ही’ उत्तरे दिली होती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हजारो लाखो लोक आयएएस आणि आयपीएस होण्याचे मोठे स्वप्न बाळगून असतात. युपीएससी ची अवघड परीक्षा पास पास होणे हे त्यांच्यासाठी खूप मोठे आव्हान असते. जे ७६१ उमेदवार या परीक्षांमध्ये यशस्वी झाले त्यापैकी अपला मिश्रा यांनी या परीक्षेत AIR ९ हे स्थान मिळवले. मिश्रा यांनी त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटचा राउंड मध्ये खूप चांगला इंटरव्यू दिला. या चाळीस मिनिटांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त म्हणजेच २१५ एवढा स्कोर केला.

    These answers got Dr. Apala Mishra Mishra to get highest score in UPSC interview

    तर आपण बघुया त्यांना या इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि मिश्रा यांनी दिलेली उत्तरे.

    १. सगळ्यात पहिले त्यांना त्यांच्या नावाचा अर्थ विचारण्यात आला.

    उत्तर : ऋग्वेदातील एका साध्वीच्या नावावरून त्यांचे नाव हे  ठेवण्यात आले आहे. अपला यांच्या आईला साहित्य विषयांमध्ये खूप रुची होती. त्या हिंदीच्या प्रोफेसर आहेत. त्यामुळेच त्यांच्या आईने हे नाव ठेवले.

    २. तिचे कुटुंब हे आर्मी बॅकग्राऊंडमधील आहे. त्यावरून आर्मी बॅकग्राऊंडमध्ये असल्याचे सकारात्मक मुद्दे तसेच कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले याबाबत विचारण्यात आले.

    उत्तर : “आर्मी मध्ये विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. याप्रमाणे हे पाहणे आणखी कठीण होत चालली आहेत. यादी सगळ्यात मोठा चालेल हे स्त्रियांसाठी होते परंतु त्यांनाही आता योग्य संधी दिली जात आहे. त्याचबरोबर भारत आत्मनिर्भर बनत आहे व आता भारताकडे शस्त्रास्त्राची निर्मिती वाढत चालली आहे आहे.”


    UPSC Civil परीक्षेतील घवघवीत यश! १३१ उमेदवार उत्तीर्ण! राचकोंडा पोलिस आयुक्त IPS महेश भागवत यांच्या मोफत मार्गदर्शनामुळे झाले शक्य


    ३. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांमधील त्यांना विचारण्यात आले.

    उत्तर :  “भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात आणि हीच भारताची खासियत आहे. भारतात विविधतेत एकता दिसते.”

    ४. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले त्यांनी इंटरव्यूमध्ये घातलेल्या साडी बद्दल. त्या साडीवर असलेल्या बॉर्डरवरील चित्राबद्दल त्यांना विचारण्यात आले.

    उत्तर : “या साडीच्या ऑर्डर वर वारली पेंटिंग आहे जे महाराष्ट्रातील सह्याद्री भागातील कला आहे. हे चित्र एक सामान्य जीवन दर्शविते.

    ५. या प्रश्नामध्ये त्यांना कविता करण्यास सांगितले गेले.

    उत्तर : त्यांनी त्यांच्या भावासाठी केलेली कविता सादर केली जो सैन्यामध्ये रेकॉर्ड मेजर आहे. या कवितेत त्यांनी त्यांच्या भावाला तसेच देशाला सलाम केला आहे.

    शेवटच्या प्रश्नामध्ये त्यांना विचारले गेले त्यांच्या संघर्षाबद्दल. तेव्हा मिश्रा यांनी उत्तर दिले की संघर्ष हा कधीच अवघड काळ असतो तर त्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. अशाप्रकारे पूर्ण आत्मविश्वासाने त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवले.

    These answers got Dr. Apala Mishra Mishra to get highest score in UPSC interview

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य