वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “ईट से ईट बजा दुंगा”, अशा आक्रमक शब्दांमध्ये काँग्रेस हायकमांडलाही ज्यांनी सुनावले त्या पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यापुढे काँग्रेस हायकमांड झुकलेली दिसते आहे. काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या आक्रमक भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अतिशय सौम्य भाषा वापरली आहे. There is nothing like that, all of them are polite. They know what to do. Everyone has a style of speaking, it will be wrong to call it a rebellion: Punjab Congress in-charge Harish Rawat on Punjab Congress chief Navjot Singh Sidhu
ते म्हणाले नवज्योत सिंग सिद्धूंची स्वतःची भाषण करण्याची शैली आहे. त्याला काही बंडखोरी म्हणता येणार नाही. पंजाब काँग्रेस मध्ये सर्वजण नम्र आहेत. सर्व नेते एकमेकांना समजावून घेऊन काम करत आहेत. प्रसार माध्यमे जेवढा रंगवतात तेवढा वाद पंजाब कॉंग्रेसमध्ये नाही.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी कालच अमृतसरमध्ये भाषण करताना, मला निर्णय घेण्याची मोकळीक दिली नाही तर “ईट से ईट बजा दुंगा” म्हणजे एकेकाची वाजवीन, अशी धमकी फक्त कॅप्टन अमरिंदरसिंग यांनाच नव्हे तर काँग्रेस हायकमांडलाच देऊन टाकली होती. त्यावर हरीश रावत यांनी सौम्य प्रतिक्रिया व्यक्त करून ती त्यांची भाषणाची शैली आहे. बंडखोरी नाही, अशी मखलाशी केली आहे.
मात्र याच हरीश रावत यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग यांच्या राजकीय वादात पुढे हात टेकून काँग्रेस हायकमांडकडे आपल्याला पंजाब प्रभारी पदावरून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.
उत्तराखंडमध्ये येत्या सहा महिन्यांमध्ये निवडणुका आहेत. हरीश रावत तिथले मुख्यमंत्री होते. त्या राज्यातल्या निवडणुकीत प्रचारासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी स्वत:ला पंजाबच्या राजकीय पेचातून बाजूला काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
There is nothing like that, all of them are polite. They know what to do. Everyone has a style of speaking, it will be wrong to call it a rebellion: Punjab Congress in-charge Harish Rawat on Punjab Congress chief Navjot Singh Sidhu
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई