वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र त्या संदर्भात ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज असून SBI स्टेट बँकेने या संदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. There is no need to fill in the slip when exchanging 2000 notes
2000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना SBI बँकेच्या कुठल्याही शाखेत बँक स्लिप भरण्याची गरज नाही, तसेच आयडेंटिटी प्रूफ दाखवण्याचीही जरुरत नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना एकावेळी फक्त 20 नोटांच्या बदल्यात दुसऱ्या मूल्याच्या नोटा मिळतील. त्यापेक्षा अधिक नोटा मिळणार नाहीत, हे रिझर्व बँकेने आधीच जाहीर केले आहे. तो नियम कायम असल्याचे SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.
There is no need to fill in the slip when exchanging 2000 notes
महत्वाच्या बातम्या
- मग “त्या” वेळेला आठवला नाही का बहिष्कार??; फडणवीसांनी वाचली काँग्रेसच्या उद्घाटनांची भली मोठी जंत्री!!
- ऑनलाईन गेमिंग पोर्टल्स कंपन्यांची 4000 कोटींची हेराफेरी ईडीच्या 25 ठिकाणच्या छाप्यांमधून उघडकीस!!
- सेंगोल राष्ट्रीय वारसा काँग्रेसने का दडवला??, “रहस्य” उघड; “नेहरूंची सोनेरी काठी” म्हणून ठेवला होता अलाहाबाद संग्रहालयात!!