प्रतिनिधी
नवी दिल्ली : कररचनेत बदल केले नाहीत. सर्वसामान्य नोकरदारांना केंद्रीय अर्थसंकल्पात दिलासा दिला नाही. असे का केले?, या प्रश्नावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत एक ट्विस्टेड उत्तर दिले.There are no changes in the tax structure, no relief to the common man
कोरोना महामारीच्या काळात जनतेवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी कोणत्याही प्रकारचे कर वाढवू नयेत, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. या सूचना प्रामुख्याने गेल्या वर्षीसाठी होत्या. तशाच सूचना या वर्षीसाठीही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कररचनेत फेरबदल करून कर वाढवून जनतेवर बोजा टाकलेला नाही, असे उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिले.
कोरोना महामारीच्या काळात वित्तीय तूट कितीही वाढली तरी सर्वसामान्यांवर कर वाढवून बोजा टाकायचा नाही, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. वित्तीय तुटीवर तोडगा काढण्यासाठी वेगळे मार्ग शोधा. पण कर वाढवू नका, असा पंतप्रधानांचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही कररचनेत बदल करून कर वाढवले नाहीत, असे उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिले.
प्रत्यक्षात हा प्रश्न कररचनेत बदल करून मध्यमवर्गीय नोकरदार यांना दिलासा देण्यासंदर्भातला होता. गेल्या 6 वर्षात कररचनेत फेरबदल केलेला नाही. कोरोना काळात मध्यमवर्गीय नोकरदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर नोकरदारांचे पगारही घटले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात कररचनेत बदल करून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यात येईल, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. पत्रकारांचे प्रश्न या संदर्भातले होते. परंतु निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात गेल्या दोन वर्षात कर वाढवले नाहीत, असे उत्तर देऊन मूळ प्रश्नाला ट्विस्ट देऊन टाकला.
There are no changes in the tax structure, no relief to the common man
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : आता सर्व आरोग्य सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार, अर्थमंत्र्यांनी केली नवीन पोर्टलची घोषणा
- Budget 2022 : अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या तरतुदी? तीन नवीन योजना, 2 लाख अंगणवाड्यांचा विस्तार, वाचा सविस्तर…
- Budget 2022 : गरिबांसाठी वर्षभरात 80 लाख घरे बांधणार, 48 हजार कोटींची तरतूद, वाचा केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
- Budget 2022 : कर रचनेत बदल नाही, प्राप्तिकर दात्यांच्या पदरात काय पडले? वाचा अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा