• Download App
    काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार | There are around 20 people Congress will bear expenses Till BJP is in Centre there will always be a possibility of buying MLAs Mahesh Joshi

    काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी – जयपूर – आसाममध्ये विधानसभेचे निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच माइंड गेम खेळत काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाने आपले संभाव्य आमदार राजस्थानला पाठविले खरे… पण त्याचवेळी नेमके किती लोक राजस्थानात गेलेत किंवा राजस्थानात आलेत, या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी हात वर केलेत. There are around 20 people Congress will bear expenses Till BJP is in Centre there will always be a possibility of buying MLAs Mahesh Joshi

    काँग्रेसचे नेते आणि स्वतः बद्रुद्दीन अजमल यांनी आपले संभाव्य आमदार राजस्थानात गेल्याचे कबूल तर केले आहे. पण नेमके किती लोक तिकडे गेलेत, हे माहिती नसल्याचे अजमल यांनी गुवाहाटीत पत्रकारांना सांगितले आहे. भाजप आमचे आमदार खरेदी करतील, ही भीती आहे. भाजपवाल्यांनी अजून आमच्याशी संपर्क साधलेला नाही. पण ते नक्की साधतील. त्यावेळी सावधगिरी म्हणून काही लोक राजस्थानला गेलेत. पण नेमके कोण आणि किती गेलेत ते मला माहिती नाही, असे अजब विधान अजमल यांनी पत्रकारांशी बोलताना केले.



     

    त्याचवेळी काँग्रेस आणि आपला पक्ष ऑल इंडिया युनायटेड फ्रंट हे बहुमताचे सरकार आसाममध्ये स्थापन करतील, असा दावाही अजमल यांनी केला.

    तर तिकडे राजस्थानात काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी वेगळेच वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, राजस्थानात काही लोक आले आहेत हे खरे आहे. ते २० लोक आहेत. पण ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, काँग्रेस त्यांच्या निवासाचा आणि अन्य व्यवस्थांचा खर्च करेल, अशी ग्वाही महेश जोशी यांनी फेअरमाऊंट हॉटेलबाहेर पत्रकारांशी बोलताना दिली.

    या तथाकथिक संभाव्य आमदारांची शाही व्यवस्था फेअरमाऊंट या हॉटेलमध्ये करण्यात आल्याचे आधीच काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले होते.

    There are around 20 people Congress will bear expenses Till BJP is in Centre there will always be a possibility of buying MLAs Mahesh Joshi

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी