• Download App
    सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली|The young woman stopped the transport minister's car, want to work asbus driver

    सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली

    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड : सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी हरयाणातील एका तरुणीने पंजाबचे परिवहन मंत्री अरमिंदर सिंह राजा यांची गाडीच अडवली. या तरुणीने आपल्याकडे जड वाहतूक परवाना असून मला सरकारी बस चालवायची असल्याचे म्हटले. शेवटी मंत्र्यांना तिला आश्वासन द्यावे लागले.The young woman stopped the transport minister’s car, want to work asbus driver

    गाडी अडविल्यावर या तरुणीला अनेकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपला हट्ट सोडलाच नाही. त्यामुळे, मंत्री राजा यांनी पीआरटीसीच्या कार्यकारी संचालक (एमडी) यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेण्यास सांगितले.



    मंत्री राजा यांनी एमडी पीआरटीसी यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेऊन शक्य असल्यास तिला नोकरी देण्याचेही सूचवले. जर एक महिला एमडी होऊ शकते, तर एक मुलगी बसही चालवू शकते. जर ही मुलगी बस चालवत असेल, तर पीआरटीसीचं नाव होईल, असेही राजा यांनी म्हटले.

    नोकरीची मागणी करणारी ही मुलगी हरियाणाची रहिवाशी असून तिला वडिल नाहीत. . या मुलीने जडवाहतूक परवाना काढला आहे. तिला अनेकांनी स्पोर्टसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने बस चालविण्याचाच हट्ट धरला आहे. त्यासाठी, गेल्या अनेक तासांपासून मंत्रीमहोदयांच्या गाडीची ती वाट पाहत होती.

    परिवहनमंत्री राजा वडिंग यांनी एमडीला फोन करुन संबंधित मुलीला शक्य असल्यास नोकरीवर घेण्याचं सूचवलं होतं. त्यावेळी, आजकाल वातावरण खराब असल्याचं एमडींनी मंत्र्यांना सांगितलं. मात्र, मुलीने कुठल्याही परिस्थितीशी सामना करायची तयारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, मंत्री राजा यांनी मुलीला एमडींचा नंबर देऊन त्यांना कॉल करण्याचे सांगितले.

    The young woman stopped the transport minister’s car, want to work asbus driver

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख