• Download App
    पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह|The young man and the young woman who ran away got married at the police station

    पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह

    विशेष प्रतिनिधी

    सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलीसच वऱ्हाडी बनले. पळून गेलेल्या प्रेमी युगलाच पोलीस ठाण्यातच विवाह लावण्यात आला. यासाठी पोलीसांनी दोघांच्याही घरच्यांची समजूत काढून त्यांना तयार केले. बिहारीगढ पोलीस ठाण्यात युवक-युवतीच्या कुटुंबीयांच्या सहमतीने हा सोहळा पार पडला.The young man and the young woman who ran away got married at the police station

    अब्दुलपूर गावातील एकाने त्याची मुलगी मीनाक्षी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. त्याचा तपास करताना पोलिसांनी रहीमपूरमध्ये राहणाऱ्या एकाच्या घरातून तिला शोधून काढले.



    युवक सूरज (२१) व युवती मीनाक्षी (१९) यांनी सज्ञान असल्याचे पुरावे दिले व विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली.हे युगुल एकाच समुदायाचे आहेत व विवाह करू इच्छित आहेत, असे पोलिसांना त्यांनी सांगितले.

    यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून समजावले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी विवाहाला सहमती दिली. पोलीस ठाण्यातच पुरोहित बोलावून समाजातील जबाबदार लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ साजरा करण्यात आला.

    The young man and the young woman who ran away got married at the police station

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक