• Download App
    २०२२ हे वर्ष राज्यात महिला शेतकरी सन्मान म्हणून साजरे करणार - कृषीमंत्री दादा भुसेThe year 2022 will be celebrated in the state as an honor for women farmers - Agriculture Minister Dada Bhuse

    २०२२ हे वर्ष राज्यात महिला शेतकरी सन्मान म्हणून साजरे करणार – कृषीमंत्री दादा भुसे

    महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांचे सक्षमीकरण वेगवेगळ्या कृषी योजनेच्या माध्यमांतून करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.The year 2022 will be celebrated in the state as an honor for women farmers – Agriculture Minister Dada Bhuse


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महिला सन्मान वर्षाच्या धोरणनिश्चितीसाठी राज्यस्तरीय महिला शेतकर्‍यांचे पहिले चर्चासत्र कृषी आयुक्तालयातील पद्मश्री सभागृहात झाले.यावेळी सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज्यात २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करणार असल्याची माहिती दिली.

    शेतीतील कल्पक तसेच नवीन प्रयोगांची माहिती महिला शेतकर्‍यांना व्हावी यासाठी ‘आत्मा’मार्फत शेतपाहणी, प्रशिक्षण व भेट, कृषी सहलींसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली जाईल.दादा भुसे यांनी सांगितले की ,याद्वारे महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांचे सक्षमीकरण वेगवेगळ्या कृषी योजनेच्या माध्यमांतून करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.



    त्या सर्व मुद्द्यांची नोंद घेत त्याचे प्रारुप मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.महिला शेतकरी, शेतमजुरांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये राखीव असून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगामध्येही महिलांसाठी ३० टक्के राखीव प्रमाण ठेवण्यात येत आहे.शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये किमान २० टक्के महिला संचालक आणि ३० टक्के महिला सभासद हव्यात अशाही सूचना दिल्याचेही भुसे यांनी सांगितले.

    The year 2022 will be celebrated in the state as an honor for women farmers – Agriculture Minister Dada Bhuse

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र