• Download App
    पंतप्रधानांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित मेबॅक मर्सिडीज, स्फोटालाही देणार नाही दाद The world's safest Maybach Mercedes in PM's contingent

    पंतप्रधानांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित मेबॅक मर्सिडीज, स्फोटालाही देणार नाही दाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आता आणखी एका मर्सिडीज कारची भर पडली आहे. मर्सिडीज कंपनीची ही कार असून, तिचा मॉडेल नंबर मर्सिडीज-मेबॅक 650 गार्ड आहे. ही जागातील सर्वाधिक सुरक्षित मोटार मानली जाते.The world’s safest Maybach Mercedes in PM’s contingent


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आता आणखी एका मर्सिडीज कारची भर पडली आहे. मर्सिडीज कंपनीची ही कार असून, तिचा मॉडेल नंबर मर्सिडीज-मेबॅक 650 गार्ड आहे. ही जागातील सर्वाधिक सुरक्षित मोटार मानली जाते.

    या मोटारीवर बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचा परिणाम होत नाही. अगदी दोन फुटांवर स्फोट झाला तरी ही मोटार सुरक्षित असते. मोटारीच्या दरवाजाचुया काचेला विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामधुन एके 47 बंदुकीची गोळी देखील आरपार जाऊ शकत नाही.या मोटारीला एक्सप्लोसिव रेसिस्टेंट व्हिकल 2010 इतकी रेटिंग मिळाली आहे. अवघ्या दोन मीटर लांबीवर देखील स्फोट झाला तरीही कारमधील व्यक्ती सुरक्षित असतो.

    कारच्या खिडक्या पॉली काबोर्नेटसह लेपित आहेत. हे गॅस अटॅक झाल्यास केबिनला स्वतंत्र हवा पुरवठा देखील मिळतो. मर्सिडीज-मेबॅक 650 गार्ड मध्ये विशेष रन-फ्लॅट टायर देण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्याने टायरवर निशाणा देखील साधला तरीही टायरला कोणतीही इजा न होता, ते व्यवस्थित वेग धरणार शकतील. इंधन टाकीवर एक विशेष एलिमेंट कोट देण्यात आला आहे. जर कोणी इंधन टाकीवर गोळीबार जरी केला तर एलिमेंट कोट हा त्याला तात्काळ नष्ट करतो. एलिमेंट कोट हा अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरमध्ये वापरण्यात येतो. त्याच्या सामग्रीने हा एलिमेंट कोट कारसाठी तयार करण्यात आला आहे.

    या मोटारीमध्ये केवळ दोन सीटच आहे. जे प्रवासादरम्यान थकवा आल्यानंतर आरामदायी प्रवास देखील करू शकते. प्रवाशांच्या हिशोबाने त्यात लेगरुम तयार केले जाऊ शकते. कारच्या मागील सीटाच्या जागी देखील चेंजेस करण्यात आले आहे. मर्सिडीज-मेबॅक 650 गार्डची किंमत सुमारे 12 कोटींच्या आसपास आहे. गेल्या वर्षी आलेल्या मर्सिडीज-मेबॅक र600 ची किंमत 10.5 कोटी इतकी आहे.

    नवीन कारचे अपग्रेडेशन सामान्यत: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (रढॠ) द्वारे केले जाते. जे देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेची काळजी घेते. एसपीजी सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन राज्याच्या प्रमुखाला वाहन अपग्रेड आवश्यक आहे की नाही हे ठरवते. अशा परिस्थितीत आता पीएम मोदींच्या ताफ्यातील वाहने अपग्रेड करण्यात आली आहेत. मर्सिडीज-मेबॅक 650 गार्ड रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरवरुन अपग्रेड केले गेले आहे.

    The world’s safest Maybach Mercedes in PM’s contingent

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते