विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाबवरून वादंग पेटले असताना द वायचे संपादक सिध्दार्थ वरदराजन यांचे भाऊ आणि ब्रिटीश लेख टिंकू वरदराजन यांनी विभाजनवादी ट्विट केले आहे. दक्षिणेतील राज्ये भारतापासून वेगळी करून द्रवीडीस्थान करायचे आपले स्वप्न आहे, परंतु त्यामध्ये आत कर्नाटकाचा समावेश करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.The Wire editor’s brother’s divisive tweet, dream of Dravidistan separating southern states from India
ब्रिटिश लेखक आणि पत्रकार टुंकू वरदराजन यांनी म्हटले आहे की, रिपब्लिक ऑफ द्रवीडीस्थान हे आपले स्वप्न आहे. त्यासाठी अज्ञानाच्या अंधकारात असलेल्या गायपट्यातून स्वतंत्र व्हायचे आहे. परंतु, आता मी ठरविले आहे की कर्नाटक यापुढे स्वतंत्र ‘द्रविड’ राष्ट्रात सामील होण्यास पात्र नाही. त्यामुळे तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ ही चार राज्येच स्वतंत्र द्रवीडीस्थानचा भाग बनतील.
- भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार; कर्नाटकातील मंत्र्यांचे भाकीत
टंकू वरदराजन यांची भारताविरुध्द गरळ ओकण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हिटलरशी तुलना करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर पाच दक्षिण भारतीय राज्यांचे मिळून बनलेले एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. भारतापासून वेगळे होऊन स्वत:चे एक प्रबुद्ध प्रजासत्ताक व्हावे असे त्यांना वाटते.
संपूर्ण दक्षिण भारत देशाच्या इतर भागापासून वेगळा करण्याची विभाजनवादी भूमिका ते मांडत आहेत. भारत म्हणजे गाय पट्टा आहे आणि अंधकारात बुडालेला आहे असे ते म्हणतात.टंकू वरदराजन यांनी देशविरोधी ट्विट केल्याबद्दल अनेक ट्विटरकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना टॅग करून देशद्रोहाचा आरोप लावण्याची मागणी केली आहे. सरकारने ट्विटरला अशी देशद्रोही खाती बंद करायला लावावीत. भारताविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ट्विटरवर बंदी घालावी अशी मागणीही केली आहे.
The Wire editor’s brother’s divisive tweet, dream of Dravidistan separating southern states from India
महत्त्वाच्या बातम्या
- आता कारमधील सर्व प्रवाशांना थ्री पॉर्इंट सीट बेल्ट बंधनकारक, नितीन गडकरी यांची माहिती
- नवज्योत सिंग सिध्दू म्हणतात, शेवटच्या श्वासापर्यंत करणार ख्रिश्चन धर्माचे रक्षण
- इंग्रजीचे प्रकांड पंडीत शशी थरुर यांना रामदास आठवले यांनी दिले इंग्रजी स्पेलींगचे धडे
- सर्व गरीब, पीडित, वंचितांपर्यंत सरकारी योजनांचे 100% लाभ पोचवणे हाच खरा सेक्युलॅरिझम ;मोदी