टोलनाक्यावरील रांगेत अडकून पडण्याचा छळ आता संपणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलाय. 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या तर वाहनांना टोल न भरता टोल नाका पास करण्याची परवानगी दिली जाणार आहे.The wait at the toll booths is over, there is no need to pay toll if the queue is longer than 100 meters
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टोलनाक्यावरील रांगेत अडकून पडण्याचा छळ आता संपणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही,
असे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलाय. 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या तर वाहनांना टोल न भरता टोल नाका पास करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
एनएचआयएने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता प्रत्येक टोल नाक्यावर 100 मीटर अंतरावर एक पिवळ्या रंगात रेष ओढली जाईल. त्यापेक्षा मोठी रांग लागली तर पुढच्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मार्चमध्ये लोकसभेत मोठी घोषणा केली होती. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी फास्टॅग यंत्रणा बसवण्यात येईल. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.
लोक जेवढा प्रवास जेवढा करतील, तेवढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे.याचाच एक भाग म्हणून रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार आहे.
त्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप मिळेल. जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार आहे. वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार आहे. यामध्ये कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क असून 20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह आहेत. तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती यातून मिळते.
जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याआधारे वाहनाच्या हलचालीवरून टोल आकारला जाणार आहे.
The wait at the toll booths is over, there is no need to pay toll if the queue is longer than 100 meters
महत्त्वाच्या बातम्या