प्रतिनिधी
मुंबई : मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी मनसेने आंदोलन पुकारल्यानंतर दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी मुंबईतील २६ मशिदींच्या धर्मगुरुची बैठक झाली. रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर आता मुंबईतील मशिदीत पहाटेची अजान ही भोंग्याविना करण्यात येईल, असा निर्णय घेतला. The trumpets of 26 mosques in South Mumbai are closed
– मालाड, मालवणीत अंमलबजावणी
भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लिम धर्मगुरुंमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दुसरीकडे मुंबईतील झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी मुंबईतील मालाडू मालवणी येथील मशिदींमधून अजान देण्याबाबत मशिदींचे ट्रस्टी आणि मौलानांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मालाड, मालवणीतील जवळपास सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबई पाठोपाठ राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुस्लिम धर्मगुरुंनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सकाळची अजान ही भोंग्याविनाच करण्याचा निर्णय घेतला आहे.
– मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा
बुधवारी ‘सुन्नी बडी मशिदी’मध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. यामध्ये भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर न करता मशिदींमध्ये अजान केली जाईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.
– रत्नागिरीत भोंग्यावरची अजान बंद
रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनीही सामाजिक सलोख्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीत 30 हून अधिक मशिदींवर पहाटेची अजान भोंग्यावर होणार नाही, असे जाहीर केले आहे. रत्नागिरीत बुधवारपासून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तर पहाटेनंतरच्या अजान सुद्धा कमी आवाजाच्या डेसीबलमध्ये केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
The trumpets of 26 mosques in South Mumbai are closed
महत्वाच्या बातम्या
- भीमा कोरेगाव दंगल : पवारांचे आरोप ठरले खोटे; पोलिसांची संभाजी भिडेंना क्लीन चिट; आयोगापुढे पवारांची आज साक्ष
- भारत वृत्तपत्र स्वातंत्र्यात जगात १५० व्या ठिकाणी, पहिला क्रमांक नॉवेर्चा, तर डेन्मार्क दुसरा
- Raj Thackeray : मनसे इफेक्ट; मुंब्रा, कापूरबावडीतील मशिदींवरील भोंगे उतरवले!!
- NIA Affidavit : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेने दिले प्रदीप शर्माला 45 लाख!!