• Download App
    धोका संपला नाही, आता केरळमध्ये झिका विषाणूचा शिरकाव; डासांना रोखा|The threat is not over, now Zika virus has spread in Kerala

    धोका संपला नाही, आता केरळमध्ये झिका विषाणूचा शिरकाव; डासांना रोखा

    विशेष प्रतिनिधी

    तिरुअनंतपुरम : देशात कोरोनाच्या महामारीचा धोका अद्याप कायम असताना केरळमध्ये झिका विषाणू आढळून आला आहे. एका गर्भवती महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले असता ते देखील पॉझिटिव्ह आले आहेत.The threat is not over, now Zika virus has spread in Kerala

    या २४ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.



    ताप, डोकेदुखी आणि अंगावर व्रण उमटल्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला दिसणाऱ्या लक्षणांमुळे चाचणी करून नमुने तातडीने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ वायरोलॉजीकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये झिका विषाणू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    या महिलेसोबतच तिरुअनंतपुरममधून एकूण १९ जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे सांगितलं जात आहे. हा व्हायरस करोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते.

    डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.झिका व्हायरसची लक्षणं डास चावल्यानंतर २ ते ७ दिवसांपर्यंत दिसू शकतात. सौम्य ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, उलटी अशी या विषाणूची काही लक्षणं आहेत.

    The threat is not over, now Zika virus has spread in Kerala

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!