वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून मृतांचा आकडा घटल्याने दिलासा मिळाला आहे. The third wave begins to recede? A large decrease in the number of new patients; The death toll also dropped
काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता कोरोनाचा वेग मंदावत आहे. तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत ४४८७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यँत पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.