• Download App
    लोकसभेत तिसरी, चौथी आघाडी कुचकामी ठरणार, भाजपला टक्कर देणे अशक्य ; रणनितीकर प्रशांत किशोर यांचे स्पष्ट मत|The Third, Fourth front in the Lok Sabha will be ineffective, impossible to beat the BJP; Strategic Prashant Kishor's opinion

    लोकसभेत तिसरी, चौथी आघाडी कुचकामी ठरणार, भाजपला टक्कर देणे अशक्य ; रणनितीकर प्रशांत किशोर यांचे स्पष्ट मत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात मोट बांधणाऱ्या कोणत्याही आघाडीशी मी सूत जमविलेले नाही. तसेच देशात तयार होणारी तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत टक्कर देणे अशक्य आहे, असे स्पष्ट मत राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले.The Third, Fourth front in the Lok Sabha will be ineffective, impossible to beat the BJP; Strategic Prashant Kishor’s opinion

    एनडिटीव्हिला दिलेल्या एका मुलाखतीत ते पुढे म्हणाले, सध्याच्या राजकीय परीस्थितीत तिसरी आघाडीचे मॉडेल कुचकामी ठरणार आहे.राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.



    ती तिसरी आघाडी आणि २०२४ च्या निवडणुकीबाबत होती का ? या प्रश्नावर ते म्हणाले, नाही. ही भेट दोघांना जाणून घेण्यासाठी होती. कारण यापूर्वी आम्ही कधीच भेटलो नव्हतो आणि कधी एकत्र काम केले नव्हते.

    एका आठवड्यात दोनदा शरद पवार यांची भेट घेण्याचे कारण काय होते? त्यावर किशोर म्हणाले, राज्यातील कठीण राजकारणाबाबत चर्चा झाली. भाजपला कसे रोखण्याचे ,उपाय काय आहेत, यावर चर्चा झाली. त्यावेळी तिसऱ्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा केली नाही.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचा त्यांना फायदा झाला तसेच सर्व विरोधी पक्षांना ममतांच्या विजयामुळे असा संदेश गेला की आपणही भाजपविरोधात उभे राहून लढू शकतो.ते म्हणाले, पवार हे त्यांचा अनुभव आणि संपर्काचे जाळे टेबलावर मांडतील आणि मी त्यांना धोरण निश्चितीच्या ब्लू प्रिंट देणार आहे.

    किशोर यांनी या पूर्वी एनडीटीव्हिला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी बाहेर पडू इच्छितो. तसेच काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, पक्षाने समजून घेतले पाहिजे की, त्याला काही अडचणी आहेत आणि त्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे.

    किशोर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर एका तासातच विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्याचा निर्णय शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी घेतला. ही बैठक शरद पवार यांच्या घरी होत आहे.

    The Third, Fourth front in the Lok Sabha will be ineffective, impossible to beat the BJP; Strategic Prashant Kishor’s opinion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही