विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: तामिळनाडू सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी केले आहे. अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी आपला पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. तामिळनाडू सरकारने राज्य उत्पादन शुल्कात कपात करताना पेट्रोलच्या किमतीत तीन रुपयांनी कपात केली. या निर्णयामुळे राज्य सरकारला यावर्षी 1,160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.The Tamil Nadu government has slashed petrol prices by Rs 3 a liter, cutting taxes in the budget
तामिळनाडूचा आदर्श घेऊन इतर राज्येही पेट्रोलवरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकतात. कारण एप्रिल 2020 पासून आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 32.25 रुपये प्रतिलिटर वाढ झाली. ते प्रतिलिटर 69.59 रुपयांवरून 101.84 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढले. त्याचबरोबर या काळात डिझेलच्या किमतीत 27.58 रुपये प्रतिलिटरने वाढ झाली. पेट्रोलची ही किंमत 62.29 रुपये प्रतिलिटरवरून 89.87 रुपये प्रतिलिटर झाली.
- तामीळनाडूत द्रुमुकने उकरून काढला परप्रांतियांचा मुद्दा, सरकारी नोकऱ्यांतील गैरतामिळांना शोधून काढणार
मे 2021 पासून सातत्याने किमती वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्व महानगरांमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. 3 मेपासून किमती वाढल्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाबसह 15 राज्यांमध्ये बहुतेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या वर गेलेत.
तामिळनाडुतील स्टालिन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सामान्य जनतेला फायदा होणार आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी सांगितले की, तामिळनाडुत २.६ कोटी लोकं दुचाकी वापरतात. सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही पेट्रोलच्या किंमती ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारला १,१६० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे. तामीळनाडू सरकारने उचललेल्या पावलाचा आदर्श महाराष्ट्र सरकार घेणार का असा सवाल केला जात आहे.
The Tamil Nadu government has slashed petrol prices by Rs 3 a liter, cutting taxes in the budget
महत्त्वाच्या बातम्या
- लवकरच येणार नाकावाटे देण्यात येणारी लस, भारत बायोटेकला दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीसाठी मंजुरी
- कंगनाने ‘धाकड’ची शूटिंग पूर्ण होताच शेअर केले बोल्ड फोटोज, रिव्हिलिंग ड्रेसमुळे युजर्सकडून झाली ट्रोल
- भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधाराने घेतली निवृत्ती, अमेरिकेसाठी खेळण्यासाठी उचलले मोठे पाऊल
- कोरोना महामारीदरम्यान भारताचे मोठे पाऊल, या वर्षी मुलांच्या डीपीटी 3 लसीकरणाबाबतीत नवा विक्रम