• Download App
    सामान्यांच्या घराच्या स्वप्नाला पीएम आवास योजनेचे बळ; अर्थसंकल्पात 66 % वाढ, 79000 कोटींची तरतूद The strength of PM Awas Yojana for the common man's dream of a house

    Union Budget 2023 : सामान्यांच्या घराच्या स्वप्नाला पीएम आवास योजनेचे बळ; अर्थसंकल्पात 66 % वाढ, 79000 कोटींची तरतूद

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कुणी उपाशी झोपू नये म्हणून मोफत अन्नधान्य योजना जशी विस्तारित केली, तसाच विस्तार आता प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असावे येथपर्यंत विकसित होत आहे. The strength of PM Awas Yojana for the common man’s dream of a house

    सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला पीएम आवास योजनेचे बळ मिळाले आहेच. या आवास योजनेच्या विस्तारासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात 66% वाढीव अशी 79000 कोटींची तरतूद केली आहे. 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात हीच तरतूद 48000 कोटींची होती.

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सामान्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेची तरतूद 66 % टक्क्यांनी वाढवून ती 79000 कोटी केली आहे.



    प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 200000 कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी उपलब्ध करून देणे, विकास आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

    पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 2000000 कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​जाईल.

    अर्थसंकल्पाचे 7 ‘आधार’

    2023 – 24 च्या अर्थसंकल्पाचे 7 आधार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. त्यांचा उल्लेख सप्तर्षी असा करण्यात आला. त्यामध्ये समावेशक विकास, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतेचा विस्तार, हरित विकास, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्र यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सरकारी फंडिंग आणि आर्थिक क्षेत्राकडून मदत घेतली जाणार आहे. ‘जनभागीदारी’साठी सबका साथ, सबका प्रयास महत्त्वाचा असल्याचा सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

    The strength of PM Awas Yojana for the common man’s dream of a house

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती