वृत्तसंस्था
गुवाहाटी – आसाममध्ये सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावला आहे. लोकसंख्या नियंत्रण हा विषय त्यांनी राज्याच्या टॉप अजेंड्यावर आणला आहे. तसाच आसामी संस्क़ृतीचा विषय देखील त्यांनी टॉप अजेंड्यावरच ठेवला आहे. The State will have a new independent Department of Indigenous Faith and Culture: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma
हेमंत विश्वशर्मा यांनी आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय (new independent Department of Indigenous Faith and Culture) स्थापण्याची घोषणा केली आहे. आसाममध्ये निपजलेले धर्मपंथ आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम हे मंत्रालय करणार आहे.
आसाममध्ये बांगलादेशातून मोठया प्रमाणावर घुसखोरी झाली आहे. त्यामुळे मूळ आसामींच्या लोकसंख्येला धक्का बसला आहे. त्याच बरोबर मेघालय, नागालँड या राज्यांशी देखील काही ठिकाणी सीमावाद आहे. या राज्यांशी आसामची चर्चा सुरू आहे. आम्ही संवादासाठी खुल्या दिलाने तयार आहोत. पण आसामच्या जमिनीवर आम्ही कोणाला अतिक्रमण करू देणार नाही, असे हेमंत विश्वशर्मा यांनी स्पष्ट केले.
एकीकडून बांगलादेशी मुसलमान आणि दुसरीकडून नागालँडमधले मिशनरी यांचे दुहेरी अतिक्रमण आसामवर होते आहे. परिणामी आसामचे लोकसंख्या संतुलन बिघडले आहे. मूळ आसामी वंशाची लोकसंख्या या अतिक्रमण करणाऱ्यांपुढे कमी झाली आहे, याकडे हेमंत विश्वशर्मा यांनी लक्ष वेधले आहे.
The State will have a new independent Department of Indigenous Faith and Culture: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत
- चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित
- दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!