• Download App
    The splendor of the country! What was the first reaction when PV Sindhu won a bronze medal in his pocket

    देशाची शान! पी.व्ही सिंधूच्या खिशात कांस्यपदक, पदक जिंकल्यावर काय होती पहिली प्रतिक्रिया

    रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने आठव्या मानांकित चीनच्या बिंगजिओचा सरळ गेममध्ये 21-13, 21-15 असा पराभव करून महिला एकेरीचे कांस्य जिंकले. The splendor of the country! What was the first reaction when PV Sindhu won a bronze medal in his pocket


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून कांस्यपदक जिंकले. असे करणारी ती सुशील कुमार नंतर दुसरी भारतीय बनली. जागतिक विजेता आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने आठव्या मानांकित चीनच्या बिंगजिओचा सरळ गेममध्ये 21-13, 21-15 असा पराभव करून महिला एकेरीचे कांस्य जिंकले. सहाव्या मानांकित सिंधूने 53 मिनिटांत सामना सहज जिंकला.

    सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 5-2 ची आघाडी घेत सामन्याची सुरुवात केली. चीनच्या खेळाडूने देखील पुनरागमन करत काही पॉइंट्स घेत बरोबरी साधली. मध्यांतरापर्यंत 11-8 ची आघाडी सिंधूकडे होती. ज्यानंतर तिने तुफान खेळी करत 21-13 च्या फरकाने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली.



    दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू चुरशीची टक्कर देत होत्या. पण सिंधूने आपला चांगला खेळ कायम ठेवत 11-8 ची आघाडी घेतली. पण प्रतिस्पर्धी हीने देखील पुनरागमन करत 11-11 ची बरोबरी साधली. त्यानंतर 15-11 ची आघाडी घेत सिंधूने पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ज्यानंतर बिंगजियाओच्या सर्व प्रयत्नांना अयशस्वी करत अखेरचा दुसरा सेटही सिंधूने 21-15 ने जिंकत सामन्यातही विजय मिळवला. या विजयासह सिंधूने कांस्य पदकही खिशात घातला.

    पी.व्ही.सिंधूच्या उल्लेखनीय कामगिरीवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण सिंधूच्या या यशामागे गेल्या अनेक वर्षांपासूनची खडतर मेहनत आहे. आजवर तिला अनेक अडथळ्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. तेव्हा कुठे आज पी.व्ही.सिंधूनं जागतिक महिला बॅडमिंटनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पीव्ही सिंधूला आतापर्यंत राजीव गांधी खेलरत्न (२०१६) आणि अर्जुन पुरस्कारनं (२०१३) सन्मानित करण्यात आलेलं आहे.यासोबतच तिला पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानंही गौरविण्यात आलं आहे.

    कांस्यपदक जिंकल्यानंतर सिंधूचे वक्तव्य

    सिंधू म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे, कारण मी इतकी वर्षे मेहनत केली आहे. माझ्या आत भावना भडकत होत्या. मी कांस्यपदक जिंकल्याचा आनंद झाला पाहिजे किंवा अंतिम सामन्यात खेळण्याची संधी गमावल्याबद्दल दुःख वाटले पाहिजे. मी जगाच्या वर आहे. मी या क्षणाचा पुरेपूर आनंद घेईन. माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी खूप मेहनत केली आणि खूप प्रयत्न केले, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पदक जिंकणे हा माझ्या देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे.

    The splendor of the country! What was the first reaction when PV Sindhu won a bronze medal in his pocket

    हत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!