पहिल्या लाटेशी यशस्वी मुकाबला केल्यावर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली होती. मात्र, दुसऱ्या लाटेने आर्थिक पातळीवर विपरित परिणाम केले आहेत. देशभरातील एक कोटींहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. वर्षभरात सुमारे ९७ टक्के कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. The second wave of corona left one crore people unemployed and reduced the economic income of 97% of the families
प्रतिनिधी
मुंबई: पहिल्या लाटेशी यशस्वी मुकाबला केल्यावर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली होती. मात्र, दुसऱ्या लाटेने आर्थिक पातळीवर विपरित परिणाम केले आहेत. देशभरातील एक कोटींहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. वर्षभरात सुमारे ९७ टक्के कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 8 टक्के इतका होता. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत बेरोजगारीचा दर 12 टक्के होण्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. याचा थेट परिणाम रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ही स्थिती काहीप्रमाणात सुधारेल. मात्र, बेरोजगारीची समस्या इतक्यात पूर्णपणे सुटणार नाही, असे सीएमआयईचे मुख्याधिकारी महेश व्यास यांनी सांगितले.
Corona Update : राज्यात रुग्णसंख्येत घट , 447 जणांचा मृत्यू ; मंगळवारी 14 हजार 123 जणांना कोरोना
सीएमआयईने देशातील 1 लाख 75 हजार कुटुंबांची पाहणी केली होती. गेल्या वर्षी म्हणजेच मे 2020 मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर 23.5 टक्यांवर पोहोचला होता. पहिली लाट ओसरल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर परिस्थिती बरीच सुधारली होती. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागला. त्यामुळे बेरोजगारी पुन्हा वाढल्याचे महेश व्यास यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नोकऱ्या गेलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळणे अवघड आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पुन्हा लगेच नोकºया मिळतील. मात्र, संघटित क्षेत्रात तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असल्यास आता साधारण वर्षभर वाट पाहावी लागेल, असे महेश व्यास यांनी सांगितले.
महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर तीन ते चार टक्के राहणे, सामान्य बाब आहे. मात्र, आता हा दर जवळपास 12 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारायची असेल तर प्रथम बेरोजगारीचा दर खाली आणला पाहिजे.
The second wave of corona left one crore people unemployed and reduced the economic income of 97% of the families
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट कामगिरी, अंध गिर्यारोहक झांग यांनी सर केले एव्हरेस्ट
- सुमार खटल्यांमुळेच राष्ट्रहिताचे विषय मागे पडत चालल्याची सर्वोच्च न्यायालयाची खंत
- कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र
- ग्राहकांना घरबसल्या दारु पोहोचवण्यासाठी विविध राज्ये सरसावली, काही राज्यांनी बनविली सरकारी ॲप