• Download App
    देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज The rise of 'Love Jihad' in the country

    देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज

    प्रतिनिधी

    मुंबई : देशात लव्ह जिहादने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. धर्मांध मुसलमान तरूण हिंदू मुलींना खोटी आमिषे दाखवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे आयुष्य बरबाद करत आहेत. त्यामुळे काही राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. विश्व हिंदू परिषदेने मागील ५ वर्षांत देशात झालेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१८ ते २०२२ या ५ वर्षांत पोलीस ठाण्यांत नोंद झालेली सुमारे ४०० लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस आली आहेत. पण लव्ह जिहाद हे प्रकरण एवढे गंभीर आहे, की हा आकडा हिमनगाचे टोक आहे. या पेक्षा प्रत्यक्षातला आकडा कितीतरी पट मोठा आहे..  The rise of ‘Love Jihad’ in the country


    लव्ह जिहाद : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शीजान खानला अटक


    विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक उत्तर प्रदेशात लव्ह जिहादची प्रकरणे घडली आहेत. इथे १०५ प्रकरणे घडली. त्या खालोखाल मध्य प्रदेशात ३०, केरळात १३, हरियाणामध्ये १३, दिल्लीत १२, महाराष्ट्रात ९ तर बिहारमध्ये ४ लव्ह जिहादची प्रकरणे घडली आहेत. ही सगळी प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहचली, त्यांच्या बातम्या झाल्या म्हणून ती उजेडात आली. त्यामुळे हा आकडा म्हणजे हिमनगाचे टोक आहे, हे निश्चित आहे. अशी अगणित ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे आहेत, जी उघडकीस आली नाहीत.

    नेमका आकडा मोठाच; पण अनभिज्ञ

    वास्तविक ही आकडेवारी अशा प्रकरणांची आहेत. जी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आणि त्यांच्या बातम्या झाल्या. त्यांची पोलीस ठाण्यात नोंद झाली. परंतू अशी बरीच प्रकरणे आहेत. ज्यांची पोलीस ठाण्यात नोंदच झाली नाही. अथवा लव्ह जिहादमध्ये फसलेल्या एखाद्या हिंदू तरुणीला जेव्हा आपण फसलो आहोत. हे समजल्यावर तिचे आई-वडील लाजेखातर तिचा स्वीकार न करता तिला तिच्या परिस्थितीवर सोडून देणारी अनेक हिंदू कुटूंबे आहेत, ज्यामुळे नेमका आकडा समोर येत नाही. वास्तविक पीडित मुलीची अशी कुटुंबीयांनी समोर येऊन पोलिसांत जाऊन धर्मांधांविरोधात गुन्हे नोंदविले पाहिजेत. त्यातून खरा आकडा समोर येऊन लव्ह जिहादची वास्तव भयानकता उघड होईल आणि त्या विरोधात कठोर कायदे करणे शक्य होईल.

    तरच हिंदू मुली सुरक्षित राहणार

    आता भाजपशासित राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी अर्थात लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात आला आहे. याठिकाणी आता हिंदू मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करून नंतर त्यांना फसवणा-या मुसलमानांच्या मुसक्या आवळणे या कायद्याने सहज शक्य होणार आहे. महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालसह पूर्वांचलातील राज्यांमध्येही हा कायदा झाला तरच हिंदू मुली खरोखर सुरक्षित बनतील.

    The rise of ‘Love Jihad’ in the country

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका