विशेष प्रतिनिधी
रायपूर : झारखंडमधील गिरिडीहजवळ काल रात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करून दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे ट्रॅक उडवून दिला. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह अनेक गाड्या इतर मार्गावरून चालवण्यात येत आहेत. काही गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. The railway track on the Delhi-Howrah route was blown up Naxal bombing; Many trains canceled
ट्रॅकवर स्फोट केल्यानंतर नक्षलवाद्यांनी तेथे एक पत्रही टाकले आहे. 21 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत प्रतिकार यशस्वी करा, असे लिहिले आहे. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पेट्रोलिंगचे गौरव राज आणि रोहित कुमार सिंग यांनी चिचकीच्या स्टेशन मास्टरला माहिती दिली की
धनबाद विभागातील करमाबाद-चिचकी स्टेशन दरम्यान शुक्रवारी रात्री 12.34 वाजता स्फोट झाला. खबरदारीचा उपाय म्हणून हावडा-दिल्ली रेल्वे मार्गाच्या गोमो-गया विभागाच्या मार्गावर गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
The railway track on the Delhi-Howrah route was blown up Naxal bombing; Many trains canceled
महत्त्वाच्या बातम्या
- जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती
- अमेरिकेचा पुन्हा एकदा भारतविरोधी प्रचार, भारतात बलात्काराच्या घटना वाढल्याने प्रवास टाळण्याचे नागरिकांना निर्देश
- मास्क घालून जेवणारा पहिला माणूस, सोशल मीडियावर राहूल गांधी यांची उडविली जातेय खिल्ली
- ओमायक्रॉन मानवी त्वचेवर 21 तासांपर्यंत जगू शकतो