वृत्तसंस्था
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. १५ दिवसांत विना अनुदानित गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला आहे. The price of a cylinder of gas has gone up by Rs 25, while unsubsidised LPG has gone up by Rs 50 in15 days
आज १ सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १८ ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती.
१४.२ किलोग्रॅमच्या विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत दर ८४४.५० रुपये झाला आहे. या किंमती आजपासून लागू होणार आहेत.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात केली होती.
दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर ८८४.५० रुपये
मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर ८८४.५० रुपये
कोलकातामध्ये ९११ रुपये
चेन्नईत ९००.५० रुपये
The price of a cylinder of gas has gone up by Rs 25, while unsubsidised LPG has gone up by Rs 50 in15 days
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यासमोरच मनसेने फोडली दहीहंडी; मुंबईत नियमभंग प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल
- काश्मीरमध्ये सैन्य दलाची नवे पाऊल; दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद; आपल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केले आवाहन
- तालिबान बरोबर भारताची प्रथमच थेट चर्चा; कतार – दोहामध्ये बैठक; दहशतवादाबाबत दिला भारताने दिला कठोर इशारा