वृत्तसंस्था
भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी पोलीस एएसआय गोपाल दासने गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण गोपाल दास हा मनोरुग्ण असून गेल्या आठ वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. The policeman who shot and killed Odisha’s health minister was a psychopath
पण या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे अजून तरी अधांतरी आहेत. गोपाळ दास गेल्या आठ वर्षांपासून मनोरुग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरू होते तर पोलीस सेवेत तो इतकी वर्षे ठेवलाच कसा गेला? त्याच्या सर्विस बुक मध्ये सरकारी नोंद काय आहे? किंवा मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या जबाबदारीत त्याची नियुक्ती कशी केली गेली?, यासह अनेक प्रश्नांचे उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी त्याने गोळ्या झाडताना त्याची नेमकी मन:स्थिती काय होती?, याचीही माहिती समोर आलेली नाही अथवा अद्यापि पोलिसांनी दिलेली नाही.
आरोग्य मंत्री नबा दास झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असताना त्यांना पोलीस कर्मचारी गोपाल दास याने पाच गोळ्या गोळ्या घातल्या. प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. ASI गोपाल दास झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील गांधी चौक पोलिस चौकीत तैनात होता. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला. आता गोपाल दास याच्या पत्नीने धक्कादायक माहिती दिली आहे.
गोपाल दास यांच्या पत्नी जयंती दास यांनी माध्यमांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, घटनेच्या आधी गोपालचे मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. तो त्यांचा शेवटचा कॉल होता. काय झाले हे मला माहीत नाही. मला बातमीवरून या घटनेची माहिती मिळाली. माझे त्या दिवशी गोपालशी बोलणे झाले नाही. यापुर्वी पाच महिन्यांपूर्वी तो घरी आला होता.
गोपालदास मनोरुग्ण
एएसआय गोपाल दास हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर 7-8 वर्षांपासून उपचार सुरू आहेत. या आजारासाठी तो गेल्या 7-8 वर्षांपासून औषध घेत आहे. औषधे घेतल्यानंतर तो नेहमी सामान्य वागायचा, असे जयंती दास यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका सार्वजनिक कार्यालयासाठी नबा दास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या स्वागतासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळून गोळीबार करून एक पोलीस पळून जात असल्याचे लोकांनी पाहिले. पण नंतर त्याला पोलीसांनी अटक केली आहे.
– शनी शिंगणापूरला १ कोटींची देणगी
नबा दास महाराष्ट्रातही चर्चेत आले होते. त्यांनी शनी शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता. १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचा हा कलश होता.
– ओडिशातले श्रीमंत मंत्री
नबा दास हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. त्यांच्या सध्या संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये 45 लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. त्यांच्याकडे सुमारे 15 कोटी रुपयांची 70 हून अधिक वाहने आहेत. ज्यामध्ये 1.14 कोटी किमतीची मर्सिडीज बेंझ देखील समाविष्ट आहे.
The policeman who shot and killed Odisha’s health minister was a psychopath
महत्वाच्या बातम्या