• Download App
    केरळमध्ये इस्लामी राजवटीचे विषारी स्वप्न; पीएफआय मोर्चात हिंदू विरोधी प्रक्षोभक घोषणा!!The poisonous dream of Islamic rule in Kerala; Anti-Hindu provocative announcement in PFI front

    केरळमध्ये इस्लामी राजवटीचे विषारी स्वप्न; पीएफआय मोर्चात हिंदू विरोधी प्रक्षोभक घोषणा!!

    वृत्तसंस्था

    तिरूअनंतपूरम : केरळ मध्ये इस्लामी राजवट आणण्याचे विषारी स्वप्न पाहणाऱ्या पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा मोर्चा हिंदूविरोधी प्रक्षोभक घोषणांचा व्हिडीओ समोर आला आहे. The poisonous dream of Islamic rule in Kerala; Anti-Hindu provocative announcement in PFI front

    काश्मिरात ज्याप्रमाणे ९०च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याप्रमाणे घोषणा केरळ मध्ये पीएफआयच्या मोर्च्यात देण्यात आल्या. एका अल्पवयीन मुलाने पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या मोर्च्यात हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा केल्या. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या व्हिडिओचा प्राथमिक तपास केल्यानंतर पीएफआयचे अलप्पुझा जिल्ह्याचे अध्यक्ष नवास वंदनम जिल्हा सचिव मुजीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा नोंदवला

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने काढलेल्या मोर्चात अल्पवयीन मुलगा प्रक्षोभक घोषणा देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडिओचा प्राथमिक तपास सुरू केल्यानंतर केरळ पोलिसांनी मंगळवारी, २३ मे रोजी  पीएफआयच्या या मोर्च्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी पीएफआयचे अलप्पुझा जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि इतर ओळखीच्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

    केरळ पोलिसांनी पुढे सांगितले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या एका कार्यकर्त्याला केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाशी संबंधित लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण घोषणा देताना एका व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले होते. केरळ पोलिसांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी एका व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे, ज्यामध्ये एक मुलगा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) मोर्चात कथितरित्या प्रक्षोभक घोषणा देताना दिसत आहे. केरळ येथील हिंदू आणि ख्रिश्चन लोकांनी शेवटचे धार्मिक संस्कार करावे लागणार आहेत, अशी धमकी पीएफआयने दिली आहे.

    The poisonous dream of Islamic rule in Kerala; Anti-Hindu provocative announcement in PFI front

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य