• Download App
    पादरी म्हणाला- उपाशी राहा मग येशूची भेट होईल, केनियात 29 जणांचा अंधश्रद्धेने मृत्यू |The pastor said - starve then Jesus will meet, 29 people died of superstition in Kenya

    पादरी म्हणाला- उपाशी राहा मग येशूची भेट होईल, केनियात 29 जणांचा अंधश्रद्धेने मृत्यू

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केनिया या आफ्रिकन देशात एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून 29 जणांनी उपाशी राहून सामूहिक आत्महत्या केली. किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलातून पोलिसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.The pastor said – starve then Jesus will meet, 29 people died of superstition in Kenya

    गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या पाद्रीने या लोकांना सांगितले होते की, जर त्यांनी उपाशी राहून स्वतःला पुरले तर त्यांची येशूशी भेट होईल आणि ते स्वर्गात जातील. आता तीन दिवसांपासून या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.



    एकाच कुटुंबातील 5 जणांना कबरीतून काढले

    केनियाच्या पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांना कबरीतून बाहेर काढले आहे. त्यांना येशूला एकत्र भेटायचे होते. पोलिसांना आतापर्यंत 65 कबरी सापडल्या आहेत. यातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

    त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अजूनही कोणीतरी जिवंत असेल या आशेने पोलीस कबर खोदत आहेत. तथापि, त्यांच्या हाती केवळ मृतदेह लागत असल्याचे दिसते. यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे.

    निर्दोष असल्याचा पाद्रीचा दावा

    ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पॉल मॅकेन्झी नावाच्या पाद्रीला अटक केली. मात्र, त्याने लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही, असे तो सतत सांगत होता. तो म्हणतो की त्याने 2019 मध्येच चर्च बंद केले. मात्र, पोलिसांनी त्याला जामिनावर सोडण्यास नकार दिला आहे.

    न्यूज वेबसाईट ‘केनिया डेली’नुसार, पोलीस आता सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करत आहेत. जेणेकरून लोक उपासमारीने मरण पावले हे सिद्ध करता येईल.

    The pastor said – starve then Jesus will meet, 29 people died of superstition in Kenya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ullu app : हाऊस अरेस्ट शो मध्ये अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या एजाज खान आणि विभू आगरवाल यांना NCW ची नोटीस!!

    CRPF jawan’s wife : CRPF जवानाच्या पत्नीला पाकिस्तानात पाठवले जाणार नाही; न्यायालयाने हद्दपारीला स्थगिती दिली

    Army-Air Force : ध्रुव हेलिकॉप्टरला HAL कडून ऑपरेशनल मंजुरी; लष्कर-हवाई दलाला विमान उड्डाणाची परवानगी