• Download App
    भाजप युवा मोर्चाची नवी टीम, आमदार राम सातपुते यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी|The new team of BJP Yuva Morcha, MLA Ram Satpute will be Vice President

    भाजप युवा मोर्चाची नवी टीम, आमदार राम सातपुते यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची नवीन टीम राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी जाहीर केलीआहे. या नव्या टीममध्ये ७ उपाध्यक्ष आणि तीन महामंत्री बनवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.The new team of BJP Yuva Morcha, MLA Ram Satpute will be Vice President

    पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचे खासदार राजू बिष्ट यांना महामंत्री बनवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मधुकेश्वर देसाई हे देखील उपाध्यक्ष झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भाजपाची नवीन टीम बांधायला सुरूवात केली आहे. तरुण, तडफदार नेत्यांनावर आता भाजपची विचारसरणी पुढ नेण्याची जबाबदारी देण्याचा त्यांचा मानस आहे.त्यामुळे आता नवीन टीमवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.



    रोहित चहल आणि वैभव सिंह यांना भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री पद मिळाले आहे. महाराष्ट्रातील मधुकेश्वर देसाई, आमदार माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते, पश्चिम बंगालमधील आमदार अनुप कुमार साहा, बिहारचे मनिष सिंह, ओडिशाच्या अर्पिता अपराजिता बडजेना, उत्तर प्रदेशचे डॉ. अभिनव प्रकाश आणि उत्तराखंडच्या नेहा जोशी यांना भाजप युवा मोर्चात स्थान देण्यात आलं आहे.

    यांना भाजप युवा मोचार्चे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. दिल्लीतील तेजिंदर पाल सिंग बग्गा, केरळचे श्याम राज, तेलंगणचे शहजादी सय्यद, छत्तीसगडचे रवी भगत, हरयाणाचे गौरव गौतम, आसामचे अरुण ज्योती हजारिका आणि मणिपूरचे निन्गथोंजम यांना भाजप युवा मोर्चात स्थान देण्यात आलं आहे. त्यांना भाजप युवा मोचार्चे राष्ट्रीय मंत्री बनवण्यात आलं आहे.

    साई प्रसाद खजिनदार, विनीत त्यागी यांना कार्यालय प्रभारी आणि अमनदीप सिंग याना मीडिया प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.दिल्लीचे कपिल परमार सोशल मीडिया प्रभारी आणि वरुण झवेरी यांना पॉलिसी अँड रिसर्चची जबाबदारी दिली गेली आहे.

    The new team of BJP Yuva Morcha, MLA Ram Satpute will be Vice President

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक