विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विमानतळ किंवा फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बॅगांचा वास घेताना पोलीसांसोबत श्वान दिसतात. अंमली पदार्थांची तस्करी शोधण्याचे काम श्वान करतातच. मात्र, आता खास श्वान दल उभारण्यात येणार असून ७० श्वानांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये त्यांना विविध प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही योजना मांडली आहे.The NCB will now have a special dog team, a dog team to be set up for drug detection, consisting of 70 trained dogs.
प्रशिक्षित विविध प्रजातींच्या ७० श्वानांचा या श्वानदलात समावेश असेल. हे श्वान विविध मोहिमेत वास घेऊन अमली पदार्थ शोधून काढतील.केंद्रीय मंत्रालयाची के-९ (श्वान) शाखा, अमली पदार्थ नियंत्रक विभाग आणि दहशतवादविरोधी राष्ट्रीय सुरक्षारक्षकाच्या सहकायार्ने अमली पदार्थ शोधक श्वान दल तयार केले जाईल.
अमली पदार्थ सेवन, व्यापार आणि तस्करीच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या एका आढावा बैठकीत ही योजना मांडली होती. राष्ट्रीय अमली पदार्थ शोधक श्वान दलात सुरुवातीला ७० प्रशिक्षित श्वान असतील.
या श्वानांना अमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) विविध विभागीय शाखांत तैनात केले जाईल. बंदरे, विमानतळ, सीमेवरील चौक्या आणि सीमापार वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि अन्य वाहनांतूनही मोठ्या प्रमाणांवर अमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्यांचा शोध प्रशिक्षित श्वान घेणार आहेत.
यामध्ये विविध देशी आणि विदेशी प्रजातींच्या श्वानांची पैदास करण्यात येणार आहे. गांजा, चरस, कोकेन, हेरॉईन, मेथाम्फेटामाइन, एमडीएमए आणि एक्स्टसी यांसारखे अमली पदार्थ हे श्वान शोधून काढतील.
सध्या लपविण्यात आलेले अमली पदार्थ शोधण्यासाठी श्वानांचा उपयोग केला जातो. मात्र, या श्वानांची संख्या कमी आहे. श्वान दल स्थापन झाल्यावर त्याच्या शाखाही विविध ठिकाणी निर्माण होणार आहेत.
The NCB will now have a special dog team, a dog team to be set up for drug detection, consisting of 70 trained dogs.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब, चंद्रकांत पाटील यांची टीका
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले रोमानियाच्या पंतप्रधानांचे आभार
- कॉँग्रेस गोव्यात अद्यापही धास्तावलेलीच, निवडून आलेलेही पक्ष सोडून जाण्याची भीती
- छत्रपतींचे प्राण पणाला लागणे, ही तर ठाकरे – पवार सरकारसाठी शरमेची बाब; चंद्रकांतदादांचे शरसंधान!!