• Download App
    बारामतीच्या चाणक्यांची उभी केलेली महाविकास आघाडी कोसळली; अमित मालवीय यांची खोचक टीका|The Mahavikas Aghadi erected by the Chanakyas of Baramati collapsed; Criticism of Amit Malviya

    बारामतीच्या चाणक्यांची उभी केलेली महाविकास आघाडी कोसळली; अमित मालवीय यांची खोचक टीका

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय टीकेचा रोख सगळा त्यांच्याकडे वळला असताना भाजपचे सोशल मीडिया नेटवर्कचे प्रमुख अमित मालवीय यांनी मात्र वेगळ्या खोचक शब्दांमध्ये शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.The Mahavikas Aghadi erected by the Chanakyas of Baramati collapsed; Criticism of Amit Malviya

    ज्या बारामतीच्या चाणक्यांना महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून नावाजले जाते, त्यांची महाविकास आघाडी आता कोसळली आहे. आधीच त्यांच्या पुतण्याने बंड करून ते नाकाकडून निघून गेले होते. तेव्हाच या चाणक्यांची नेते पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. त्यांचे दोन महत्त्वाचे सहकारी भ्रष्टाचार आणि देशद्रोहाच्या आरोपात जेलमध्ये आहेत.



    मूळात बारामतीच्या चाणक्यांना शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे लागले होते. केवळ भाजपला रोखण्यासाठी या चाणक्यांनी महाविकास आघाडी उभी केली होती. पण आता त्यांनी कुटील बुद्धीने उभी केलेली महाविकास आघाडी देखील कोसळली आहे, अशा खोचक शब्दात अमित मालवीय यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे.

    The Mahavikas Aghadi erected by the Chanakyas of Baramati collapsed; Criticism of Amit Malviya

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच

    UPSC : UPSC ची नवीन प्रणाली- IAS-IPS च्या कॅडर वाटपाचे नियम बदलले, 25 कॅडरचे 4 गटांमध्ये विभाजन, भौगोलिक झोन रद्द