• Download App
    बंगालमध्ये सर्वात कमी लसीकरण, बनावट प्रकरणेच अधिक, जे. पी. नड्डा यांनी केली पोलखोल|The lowest number of vaccinations in Bengal, more fake cases, j. P. Kelly Polkhol by Nadda

    बंगालमध्ये सर्वात कमी लसीकरण, बनावट प्रकरणेच अधिक, जे. पी. नड्डा यांनी केली पोलखोल

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : बंगालमध्ये सर्वात कमी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असून येथे बनावट लसीकरण शिबिरांचे मात्र धडाक्यात आयोजन करण्यात येत आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्ला चढविला.The lowest number of vaccinations in Bengal, more fake cases, j. P. Kelly Polkhol by Nadda

    विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेश कार्यकारी समितीच्या पहिल्या बैठकीला आभासी माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात निवडणुकीनंतर संघटित हिंसाचार होत असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात एक महिला मुख्यमंत्री असूनही महिलांवर अत्याचार होत असल्याचे सांगून नड्डा म्हणाले,



    तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनजीर्देखील दररोज लसीकरण कार्यक्रमाचे स्वरूप बदलवत आहेत. केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत असतानाही राज्य सरकार लसीकरण करण्यात अपयशी ठरले आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत सर्वात कमी लसीकरण झाले असल्याचे आपल्याला आढळून येईल.

    तसेच हे एकमेव असे राज्य आहे जेथे मोठ्या प्रमाणात बनावट लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. खुद्द सत्ताधारी तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनाही बनावट लस टोचण्यात आली.
    कोलकाता येथे बनावट शिबिरे आयोजित केल्याबद्दल मुख्य सूत्रधारासह अनेकांना नुकतीच अटक करण्यात आली.

    मतदानानंतरचा हिंसाचार राज्य सरकारचे अपयशच दर्शवितो. भाजपा कार्यकर्त्यांचे आधार कार्ड व रेशनकार्ड हिसकावून घेण्यात आले. मात्र, तरीही पोलिस उघड्या डोळ्यांनी हा सर्व प्रकार पाहात होते. महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यातील महिलाच सुरक्षित नसतील तर पश्चिम बंगालचे नागरिक तृणमूल सरकारकडून कुठल्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतील, असा सवालही नड्डा यांनी केला.

    The lowest number of vaccinations in Bengal, more fake cases, j. P. Kelly Polkhol by Nadda

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य