• Download App
    'द केरला स्टोरी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसांत बंपर कमाई, हॉलीवूडपटालाही मागे टाकणार|'The Kerala Story' box office smash, bumper collection in two days, will surpass Hollywood film

    ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसांत बंपर कमाई, हॉलीवूडपटालाही मागे टाकणार

    प्रतिनिधी

    मुंबई : ‘द केरला स्टोरी’ रिलीज होऊन दोन दिवस झाले असून शनिवारी चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे. विपुल शाह प्रॉडक्शनने ट्रेड पंडितांना आश्चर्यचकित केले आहे आणि ज्यांना हा चित्रपट प्रपोगंडा वाटत होता त्यांनाही आश्चर्यचकित केले आहे. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चला तर मग पाहूया अदा शर्मा स्टारर चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई केली आहे…’The Kerala Story’ box office smash, bumper collection in two days, will surpass Hollywood film

    The Kerala Story ची जबरदस्त कमाई

    सुदीप्तो सेनच्या ‘द केरला स्टोरी’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.03 कोटींचा व्यवसाय करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दुसरीकडे, हॉलीवूडपट गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी व्हॉल्यूम 3 या चित्रपटाला केवळ 7 कोटींची ओपनिंग मिळाली होती. केरला स्टोरी या चित्रपटाचे वर्णन देशातील एका विशिष्ट धर्माविरुद्ध द्वेष पसरवणारा चित्रपट असे करण्यात आले होते आणि काही जणांनी त्यावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच वातावरण तापले आणि काही लोक ‘द केरल स्टोरी’ला प्रपोगंडा फिल्म म्हणू लागले होते.



    शनिवारी बंपर कमाई

    ‘द केरला स्टोरी’चा वाद तापत असतानाच या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशी 50 टक्क्यांनी उडी घेत, द केरल स्टोरीने सुमारे 12.50 कोटींची कमाई केली. (आकडे प्राथमिक आहेत, बदलू शकतात). त्यानुसार या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 20.53 कोटींची कमाई केली आहे. रविवारी त्यांचा व्यवसाय आणखी वाढेल, असा अंदाज आहे. हा चित्रपटही वर्ड ऑफ माउथवर गाजत आहे. एकमेकांकडून चित्रपटाचे कौतुक ऐकून प्रेक्षक सिनेमागृहात पोहोचत आहेत.

    मध्य प्रदेशात चित्रपट करमुक्त

    शनिवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या राज्यात द केरला स्टोरी करमुक्त करण्याची घोषणा केली होती. यामागचे कारण त्यांनी सांगितले की, हा चित्रपट समाजाला जागृत करण्याचे काम करत आहे, विशेषतः मुलींनी हा चित्रपट जरूर पाहावा. एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात हा चित्रपट असल्याचे सांगितले

    ‘The Kerala Story’ box office smash, bumper collection in two days, will surpass Hollywood film

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र