• Download App
    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ने ओलांडला 150 कोटींचा आकडा; "बॉलिवूडचे पोपट" बोलू लागले... डोलू लागले!!|The Kashmir Files : 'The Kashmir Files' continues winning streak, crosses Rs 150 crore mark at box office

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ने ओलांडला 150 कोटींचा आकडा; “बॉलिवूडचे पोपट” बोलू लागले… डोलू लागले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – काश्मीरमधील १९९० च्या दशकातील हिंदूंच्या नरसंहाराचे भयानक सत्य दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्सने बॉक्स ऑफीसवर १५० कोटींचा आकडा ओलांडला. आता त्याने २०० कोटींच्या कमाईच्या दिशेने झेप घेतली आहे. त्यानंतर बॉलिवूडचे पोपट बोलू आणि डोलू लागले आहेत.The Kashmir Files : ‘The Kashmir Files’ continues winning streak, crosses Rs 150 crore mark at box office

    सिनेमा क्रिटिक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवर द काश्मीर फाईल्स सिनेमाचे बॉक्स ऑफीस कलेक्शन मांडले आहे. त्यानुसार सिनेमाने १५० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला असून त्याची वाटचाल २०० कोटींच्या दिशेने वेगात सुरू असल्याचे म्हटले आहे.



    आतापर्यंत सिनेमावर राजकीय वाद बरेच रंगले असले, तरी बॉलिवूडचे पोपट मात्र, बोलत नव्हते. पण सिनेमाने १५० कोटींचा आकडा ओलांडताच बॉलिवूडचे पोपट बोलू आणि डोलू लागले आहेत. अमीर खानने द काश्मीर फाईल्स या सिनेमाविषयी गौरवोद्गार काढले आहेत. आपण सिनेमा आवर्जून पाहणार असल्याचे त्याने म्हटले आहे. काश्मिरी हिंदूंवरचे अत्याचार भयानक होते. ते या सिनेमात दाखविण्यात आले आहेत. अत्याचार झालेल्या समाजाची मानसिक स्थिती भयावह झाली असेल, त्याची कल्पना आपण करू शकतो, असे अमीर खानने म्हटले आहे. त्यावेळी त्याच्या शेजारी उभी राहून अलिया भटने टाळ्या वाजविल्या आहेत.

    चार दक्षिणी भाषांमध्ये डबिंग होणार

    देशात मोठा माहोल तयार केलेला चित्रपट “द काश्मीर फाईल्स” आता चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये डब होऊन प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यांवर घेतले असले तरी काँग्रेसनिष्ठ राजकीय नेत्यांनी यावर वाद निर्माण केला आहे. मात्र, आता “द काश्मीर फाईल्स” संबंधित आणखी एक आनंदाची बातमी असल्याचे सांगितले जात आहे.

    हिंदू नरसंहाराची भयावह कथा

    ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचे घर सोडावे लागले होते. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका असून हा चित्रपट आता प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे.

    The Kashmir Files : ‘The Kashmir Files’ continues winning streak, crosses Rs 150 crore mark at box office

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते