काश्मीर मध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराचे भयानक वास्तव दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” गाजायला सुरुवात झाल्यापासून देशात आणि परदेशात त्याच्या समर्थकांचे आणि विरोधकांचे असे दोन गट पडले आहेत. एकीकडे “द काश्मीर फाईल्स” बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 60 कोटींचा आकडा त्याने केव्हाच पार केला आहे. आता 100 कोटींच्या क्लबमध्ये त्याचा लवकरच प्रवेश होईल.The Kashmir Files – Gujrat Files – Bengal Files: The Age of Files; Open one now
पण त्याच वेळी या सिनेमा विरोधात काही “विशिष्ट” सिनेमा थिएटर मालकांनी “फिल्म जिहाद” पुकारून सिनेमा बंद पाडायचे डाव केले आहेत.
गुजरात फाईल्स
तर दुसरीकडे “द काश्मीर फाईल्स”च्या यशाने बॉलिवुडमध्ये हडकंप माजला असून बिगर स्टारर सिनेमाला एवढे यश मिळते. यामुळे बॉलिवूडचे तथाकथित सुपरस्टार वाळूत तोंड खुपसून बसले आहेत. त्याच वेळी “जमात ए पुरोगामी”ने वेगवेगळ्या घोषणा देखील केल्या आहेत. “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाला यश मिळते हे पाहून आणि या सिनेमाच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठामपणे उभे राहत असल्याचे पाहून दिग्दर्शक विनोद कापरी यांनी आपण “गुजरात फाईल्स” सिनेमा बनवणार असल्याचे जाहीर केले केले आहे. अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरोगाम्यांवर टीकास्त्र सोडले आहे. आता त्याच पंतप्रधानांनी “गुजरात फाईल्स”चे सत्य स्वीकारावे, असे आव्हान विनोद कापरी यांनी दिले आहे.
द बंगाल फाईल्स
विनोद कापरी यांनी “गुजरात फाइल्स” हा सिनेमा काढण्याचे जाहीर केल्याबरोबर ट्विटर वर एक जोरदार ट्रेंड सुरू झाला आहे, तो म्हणजे “द बंगाल फाईल्स” हा…!! काश्मीरमध्ये हिंदूंचा जसा नरसंहार झाला, तशा स्वरूपाचा नरसंहार बंगालमध्ये झाला आहे. हिंदूंना बांगलादेश सीमावर्ती गावातून अक्षरश: पलायन करावे लागले आहे. पश्चिम बंगाल मधले सुमारे 6 जिल्हे मुस्लिमबहुल होण्याच्या दिशेने चालले आहेत. या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये हिंदुविरोधी षडयंत्र उघडण्यासाठी उघडकीस आणण्यासाठी काहीजणांनी “द बंगाल फाईल्स” हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. तो सध्या टॉप 10 मध्ये आहे.
फायलींना चांगले दिवस
एकूण सध्या फायलींना चांगले दिवस आले असून या निमित्ताने अनेक जण एकमेकांच्या फाईली खोलण्याच्या मागे लागले आहेत. त्याचबरोबर या फाईली खोलून आपले खिसे गरम करण्याचाही मागे लागल्याचे दिसत आहे. पण एकमेकांच्या फाईली होण्याच्या नादात मूळ फायलींमधले सत्य मात्र दडपले जाता कामा नये हे निश्चित…!!
The Kashmir Files – Gujrat Files – Bengal Files: The Age of Files; Open one now
महत्त्वाच्या बातम्या
- झुलन गोस्वामी अडीचशे विकेट्स पूर्ण करणारी पहिली गोलंदाज
- महाविकास आघाडीचा दट्ट्या : चंद्रशेखर बावनकुळेंची महावितरण कामांप्रकरणी होणार चौकशी!!
- ED Faraz Malik : ईडीचे दुसरे समन्स टाळल्यानंतर फराज मालिकला ईडी तिसरे समन्स पाठविणार!!
- ED – IT Raids : युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर ईडी – इन्कम टॅक्सचे देशभर छापे, मुंबई, ठाणे, नाशकातल्या ऑफिसेसवरही तपास!!