• Download App
    "द काश्मीर फाईल्स" चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार!! The Kashmir Files convert to languages

    The Kashmir Files: “द काश्मीर फाईल्स” चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : देशात मोठा माहोल तयार केलेला चित्रपट “द काश्मीर फाईल्स” आता चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये डब होऊन प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यांवर घेतले असले तरी काँग्रेसनिष्ठ राजकीय नेत्यांनी यावर वाद निर्माण केला आहे. मात्र, आता “द काश्मीर फाईल्स” संबंधित आणखी एक आनंदाची बातमी असल्याचे सांगितले जात आहे. The Kashmir Files convert to languages

    चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही होणार डब

    ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचे घर सोडावे लागले होते. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका असून हा चित्रपट आता प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे.

    या चार भाषांमध्येही होणार प्रदर्शित

    एका खासगी वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाते यश पाहता निर्मात्यांनी हा चित्रपट आणखी चार प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, हा चित्रपट आता तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट हिंदी भाषेत असल्याने पाहता येत नाही, अशा प्रेक्षकांसाठी ही गुडन्यूज आहे. यामुळे आता हा चित्रपट दक्षिण भारतीय प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे.

    The Kashmir Files convert to languages

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’