Monday, 5 May 2025
  • Download App
    The Kashmir Files : प्रत्यक्ष भेटीत पवारांनी दिले आशीर्वाद..., पण नंतर!!; विवेक अग्निहोत्रीने केले "एक्सपोज"!!|The Kashmir Files: Blessings given by Pawar in a face to face meeting ..., but later !!; Vivek Agnihotri did "Expose"

    The Kashmir Files : प्रत्यक्ष भेटीत पवारांनी दिले आशीर्वाद…, पण नंतर!!; विवेक अग्निहोत्रीने केले “एक्सपोज”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे वादग्रस्त विधान करतात सिनेमाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने पवारांना “एक्सपोज” केले आहे. “द काश्मीर फाईल्स” सिनेमाला भारतात प्रदर्शित करण्याची परवानगीच द्यायला नको होती, असे वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात केले होते. या त्यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना विवेक अग्निहोत्रीने शरद पवारांशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीचा उल्लेख केला आहे आणि त्यात काय घडले होते हे सांगितले आहे.The Kashmir Files: Blessings given by Pawar in a face to face meeting …, but later !!; Vivek Agnihotri did “Expose”

    शरद पवार यांच्याविषयी मनात आदर आहे. परंतु, पवारांचे वागणे दुटप्पी असल्याची टीका सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली. पवारांकडून “द काश्मीर फाईल्स” चित्रपटावर टीका करण्यात आली. त्यानंतर अग्निहोत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर दिले.



    – काय केला पवारांनी आरोप?

    नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक मेळाव्यात पवार म्हणाले की, देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. भाजपा देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला.

    पवारांचा ढोंगीपणा उघड झाला तरीही…

    पवारांच्या या टीकेला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी विमान प्रवासात शरद पवार आणि त्यांच्या पत्नीची भेट झाली होती. मी आणि पल्लवीने नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी चित्रपटाबद्दल अभिनंदन करत आशीर्वादही दिले. परंतु, मीडियासमोर त्यांचे नेमके काय झाले माहिती नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो, असे विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

    The Kashmir Files: Blessings given by Pawar in a face to face meeting …, but later !!; Vivek Agnihotri did “Expose”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती; 80च्या दशकातील काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार

    निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?

    Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाणे

    Icon News Hub