वृत्तसंस्था
भोपाळ : काश्मीर मधल्या 1990 च्या दशकातल्या हिंदू नरसंहाराचे सत्य दाखवणाऱ्या “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आमने सामने आले आहेत.the Kashmir Files: Avoid giving answers to stupid, crazy and ignorant people
9 राज्यांमध्ये “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशीच मागणी भाजपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत केली. या मागणीला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणे मारले.
“द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी कशासाठी करता? विवेक अग्निहोत्री यांना सांगा तो युट्युब वर अपलोड करा. म्हणजे सगळ्यांनाच फ्री होऊन जाईल, असा टोमणा केजरीवालांनी मारला.
यासंदर्भात भोपाळ मधल्या माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठात विवेक अग्निहोत्री यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विवेक अग्निहोत्री म्हणाले, ज्याला सिनेमा समजावून घ्यायचा आहे, तो समजून घेतो. पण आपल्याकडे संस्कृत मुहावरा आहे. मूर्ख, वेडे आणि अज्ञानी लोकांना उत्तरे देण्याच्या फंदात पडू नये. त्यामुळे “द काश्मीर फाईल्स” सिनेमा दिल्लीत टॅक्स फ्री करायचा का नाही या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही.
the Kashmir Files: Avoid giving answers to stupid, crazy and ignorant people
महत्त्वाच्या बातम्या
- SONU NIGAM : महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी ! आयुक्तांनीच करून दिली होती ओळख …
- काश्मिरी पंडितांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव, 1990च्या नरसंहाराची पुन्हा चौकशी करण्याची मागणी
- Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??
- मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप