वृत्तसंस्था
बेळगावी : हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी सुरुवातीला आक्रमकपणा दाखवला खरा, पण नंतर दोन दिवसांनी माफी मागितली आहे. काँग्रेस पक्षातच आपण अलग थलग पडू ही त्या मागची भीती आहे. The Karnataka Congress working president, who called the word Hindu a dirty word, has finally apologised
एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन पूजा अर्चा करत असताना, तर दुसरीकडे ज्या कर्नाटक राज्यातून राहुल गांधी भारत जोडो यात्रा करून आले आहेत, त्या कर्नाटकात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
हिंदू हा शब्द भारतीय नाही तो पर्शियन आहे. त्या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे, असे सतीश जारकीहोळी म्हणाले होते. मात्र त्यावरून उठलेल्या वादानंतर दोन दिवसांनी सतीश सारखे ओळींनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली आहे. पण त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांना पत्र लिहून आपली हिंदू विरोधी प्रतिमा करण्यामागे कोणत्या शक्ती आहेत?, याचा शोध घेण्यासाठी कमिटी नेमण्याची मागणी केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे एका कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, तुम्ही आमच्यावर हिंदू धर्म शब्द का लादता? कसला हिंदू धर्म?, हिंदू हा शब्दच मूळात भारतीय नाही. तो पर्शियन शब्द आहे. तो इराण, इराक कझाकस्तान इथून आला आहे. हिंदू शब्दाचा अर्थ तुम्ही पाहिलात तर तो अत्यंत घाणेरडा आहे. मग असा शब्द तुम्ही आमच्यावर का लादता?, असा सवाल सतीश जारकीहोळी यांनी केला होता.
त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांना अलग-थलक पाडले. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सतीश जारकीहोळीच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध असल्याचे निवेदन काढले. पक्षातच आपण एकाकी पडल्याचे लक्षात आल्यावर सतीश जारकीहोळी यांनी माफी मागितली आहे.
एकीकडे खासदार राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेमध्ये विविध धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन तिथल्या धर्मगुरूंशी चर्चा करत आहेत. हिंदू मंदिरांमध्ये स्थळांमध्ये जाऊन पूजाअर्चा करत आहेत. आजही नांदेडच्या गुरुद्वारा मध्ये जाऊन ते पूजाअर्चा करून तिथल्या लंगर मध्ये सहभागी झाले. कर्नाटक मध्ये देखील त्यांनी अनेक मठ मंदिरांमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेदरम्यान दर्शने घेतली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची भारत जवळ यात्रा सुरू असतानाच कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यांनी हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.
The Karnataka Congress working president, who called the word Hindu a dirty word, has finally apologised
महत्वाच्या बातम्या
- राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस
- 18000 पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
- वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश