• Download App
    कॉमेडियन जुगनू ते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, आपचे भगवंत मान यांचा प्रवास|The journey of comedian Jugnu to Punjab Chief Ministerial candidate, Aap candidate Bhagwant Mann

    कॉमेडियन जुगनू ते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, आपचे भगवंत मान यांचा प्रवास

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड: जुगनू या आपल्या विनोदी भूमिकेने घराघरात पोहोचलेले कॉमेडियन भगवंत मान यांची आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. मोबाईल सर्व्हेवर लोकांकडून मिळालेल्या मतदानाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.The journey of comedian Jugnu to Punjab Chief Ministerial candidate, Aap candidate Bhagwant Mann

    आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दुपारी मोहालीमध्ये ही घोषणा केली. 48 वर्षीय मान हे आपचे एकमेव लोकसभा खासदार आहे. पक्षाने गेल्या आठवड्यात पाच दिवसीय मोबाइल फोन सर्वेक्षण सुरू केले होते.



    आपला मुख्यमंत्री चेहरा कोण असावा हे विचारले होते. आज निकाल जाहीर करताना आपतर्फे सांगण्यात आले की त्यांना मिळालेल्या 21 लाखांपेक्षा जास्त प्रतिसादांपैकी 93 टक्के मान यांच्या बाजूने होते. विशेष म्हणजे ३ टक्यांहून अधिक मते राज्य काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्या बाजूने होती, असे केजरीवाल यांनी सांगितले.

    मान यांनी २०११ मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ते आपसोबत आहेत. त्यावेळी पक्षाचे चार खासदार निवडून आले होते. मान म्हणाले, मी कॉमेडियन म्हणून सुरुवात केली, तेव्हा लोक माझ्याकडे बघायचे, मला ऐकायचे आणि हसायचे . पण आता जेव्हा ते माझ्याकडे पाहतात तेव्हा ते रडतात. पंजाबला मदत करण्यासाठी मला मदत करण्याची विनंती करतात.

    मान म्हणाले, सरकारी पदाचा वापर खºया अर्थाने लोकांसाठी करेल. पंजाबमधील लोकांसाठी, गरीबांसाठी, बेरोजगारांसाठी आणि दलितांसाठी काम करेल. मित्र आणि नातेवाईकांसाठी कधीही काम करणार नाही.

    पंजाबचे सुप्रसिद्ध कवी सुरजित पातर यांच्या कवितेचा हवाला देत, मान म्हणाले,मग सगळी पाने गळून पडली तर काय… लवकरच एक नवीन सुरुवात होईल असा विश्वास ठेवा… मी काही नवीन रोपे शोधून घेईन… तुम्ही फक्त माती तयार ठेवा..

    The journey of comedian Jugnu to Punjab Chief Ministerial candidate, Aap candidate Bhagwant Mann

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!