• Download App
    स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मिळणार जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळणार|The indigenous corona preventive vaccine covaccin will be on the World Health Organization's emergency list

    स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मिळणार जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेलं नाही. मात्र येत्या ४ ते ६ आठवड्यात यावर निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.The indigenous corona preventive vaccine covaccin will be on the World Health Organization’s emergency list

    करोना लस निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं कोव्हॅक्सिन संदभार्तील ९० टक्के दस्ताऐवज जागतिक आरोग्य संघटनेकडे जमा केले आहेत. अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, आयर्लंड आणि यूरोपियन यूनियनने अजूनही कोव्हॅक्सिनला आतत्कालीन मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी भारत बायोटेककडून आणखी माहिती मागवली आहे.



    सेंटर फॉर सायन्स अँड इन्वायरमेंटने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलताना त्या म्हणाले, कोव्हॅक्सिनचे निमार्ते भारत बायोटेक याबाबतची सर्व आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या पोर्टलवर अपलोड करत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना याचे परीक्षण करत आहे. तिसºया टप्प्यातील परीक्षण सुरु आहे.

    यासाठी सर्व आकडेवारी डब्ल्यूएचओच्या नियामक विभागाकडे जमा करावी लागते. त्यावर तज्ज्ञ समिती आपला अध्ययन करत असते. त्यात सुरक्षा, प्रभाव आणि उत्पादन गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं जातं. भारत बायोटेकने याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आशा आहे की, येत्या चार ते सहा आठवड्यात कोव्हॅक्सिनला आपत्कालीन सूचीत स्थान मिळेल.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचित मॉडर्ना, फायजर, एस्ट्राजेनेका, जॉनसेन (अमेरिका आणि नेदरलँडमध्ये), सिनोफार्मा/ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात तयार झालेल्या कोविशील्डचा समावेश आहे. मात्र कोव्हॅक्सिनला असूनही स्थान मिळालेलं नाही.

    The indigenous corona preventive vaccine covaccin will be on the World Health Organization’s emergency list

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी