• Download App
    भारत-पाक सैन्याने दिवाळीला वाटली मिठाई, पुलवामा हल्ल्यानंतर तीन वर्षांनी सुरू झाली परंपरा The India-Pak army celebrated Diwali with sweets, a tradition that started three years after the Pulwama attack

    भारत-पाक सैन्याने दिवाळीला वाटली मिठाई, पुलवामा हल्ल्यानंतर तीन वर्षांनी सुरू झाली परंपरा

    भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.The India-Pak army celebrated Diwali with sweets, a tradition that started three years after the Pulwama attack


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : भारत-पाकिस्तान सीमेवर सैनिक दिवाळी उत्साहात साजरी करत आहेत.जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सुरक्षा दल सतत गस्त घालून दिवे लावत आहेत. दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.

    तीन वर्षांनंतर दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली.पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील ही परंपरा बंद झाली होती.



    पूंछमधील चक्कन दा बाग येथे भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यावेळी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.

    तसेच कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर येथील किशनगंगा नदीवरील कमन अमन सेतू, उरी आणि तिथवाल येथेही मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली.दोन्ही देशांमधील नियंत्रण रेषेवरील युद्धविराम कराराचे काटेकोरपणे पालन होत असताना ही घटना घडली.

    The India-Pak army celebrated Diwali with sweets, a tradition that started three years after the Pulwama attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती