• Download App
    प्राप्तीकर विभागाने दिला १५,४३८ कोटी रुपयांचा रिफंड|The income tax department gave a refund of Rs 15,438 crore

    प्राप्तीकर विभागाने दिला १५,४३८ कोटी रुपयांचा रिफंड

    प्राप्तीकर विभागाने करदात्यांना १५,४३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा (रिफंड) दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच हा परतावा देण्यात आला आहे.The income tax department gave a refund of Rs 15,438 crore


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्राप्तीकर विभागाने करदात्यांना १५,४३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा (रिफंड) दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच हा परतावा देण्यात आला आहे.

    प्राप्तीकर विभागाच्या यावर्षी एप्रिलमध्ये ११.७३ लाख करदात्यांना परतावा दिला आहे. मात्र, हा परतावा कोणत्या आर्थिक वर्षांसाठी देण्यात आला आहे हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.



    प्राप्तीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वैयक्तिक प्राप्तीकराअंतर्गत ११.६१ लाख करदात्यांना पाच हजार ४७ कोटी रुपये परत करण्यात आले. त्याचबरोबर कॉर्पोरेट (उद्योग) वर्गातील २१,८४७ करदात्यांना १०,३९२ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.

    प्राप्तीकर विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) १ एप्रिल ते ३ मे २०२१ दरम्यान ११.७३ लाख करदात्यांना १५,४३८ कोटी रुपये परत केले.

    यापूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने २.३८ कोटींहून अधिक करदात्यांना २.६२ लाख कोटी रुपये परत केलेहोते. २०१९-२० या आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने १.८३ लाख कोटी रुपये परत केले होते.

    The income tax department gave a refund of Rs 15,438 crore

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार