देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत, कोरोनाकाळात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करून ते काय साध्य करू शकतात हे जगाला दाखविले आहे, अशा शब्दांत किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारात दाखविलेल्या अमर्याद विश्वासाचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. The important role of small investors in the Corona period was appreciated by Union Finance Minister Nirmala Sitharaman.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत, कोरोनाकाळात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करून ते काय साध्य करू शकतात हे जगाला दाखविले आहे, अशा शब्दांत किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारात दाखविलेल्या अमर्याद विश्वासाचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादितच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या, २०१९-२० मध्ये दर महिन्यात सरासरी चार लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली. २०२०-२१ मध्ये या संख्येत तिपटीने वाढ होऊन ती दर महिन्याला १२ लाख इतकी झाली, तर २०२१-२२ मध्ये दर महिन्याला सुमारे २६ लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत,
The important role of small investors in the Corona period was appreciated by Union Finance Minister Nirmala Sitharaman.
महत्वाच्या बातम्या