• Download App
    प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाºया पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा|The Human Rights Commission has filed a case against the police for arresting Priyanka Gandhi at night

    प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाऱ्या पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये हिंसाचार झाल्यानंतर या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना रोखणं पोलिसांच्या अंगलट आले आहे. प्रियांका गांधींना अडवले आणि कुठल्याही वॉरंट शिवाय अटक केली, त्या पोलिसांविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल केला आहे.The Human Rights Commission has filed a case against the police for arresting Priyanka Gandhi at night

    या प्रकरणी राजस्थानच्या बूंदीमधील काँग्रेस कार्यकर्ता चर्मेश शर्मा यांनी ६ ऑक्टोबरला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने ३१ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला आहे.



    उत्तर प्रदेश यूपी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालय आणि राज्यघटनेने महिलांना दिलेल्या सर्व विशेष हक्कांचं उल्लंघन केलं आहे. कलम ४६ नुसार कुठल्याही महिलेला पोलीस संध्याकाळनंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करू शकत नाही आणि ताब्यातही घेऊ शकत नाही.

    काही विशेष कारणांमुळे अटक करावीच लागली तर न्यायालयाचे वॉरंट बंधनकारक आहे. तरीही प्रियांका गांधी यांना कुठल्याही वॉरंट शिवाय रात्रीच्या वेळी अटक करण्यात आली, असं तक्रारदार काँग्रेस कार्यकर्ते चर्मेश शर्मा यांनी म्हटलं आहे.

    उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबरला हिंसाचार झाला. यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. पण त्या भागात जमावबंदी लागू असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यांना ३० तास पोलिसांनी ताब्यात ठेवल्यानंतर अटक केली. या अटकेचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठीकाणी निषेधही केला.

    The Human Rights Commission has filed a case against the police for arresting Priyanka Gandhi at night

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!