• Download App
    हिजाब प्रकरणावरून पाकिस्तान्यांना मिळाली संधी, आता आठवले मानवी अधिकार|The hijab issue gave Pakistanis a chance, now remembered human rights

    हिजाब प्रकरणावरून पाकिस्तान्यांना मिळाली संधी, आता आठवले मानवी अधिकार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकात मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्यावरून सुरू झालेल्या वादावरून पाकिस्तान्यांना भारताला बोल सुनावण्याची संधी मिळाली आहे. मानवी हक्कांची सातत्याने पायमल्ली करणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याने भारतावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.The hijab issue gave Pakistanis a chance, now remembered human rights

    पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, मुस्लिम मुलींना भारतात शिक्षणापासून दूर ठेवणे हे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यांना हिजाब घालण्यापासून रोखणे चुकीचे आहे. मुस्लिमांना दडपण्याच्या भारत सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे हे जगाने समजून घेतले पाहिजे.



    पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनीही म्हटले होते की मोदींच्या भारतात जे घडत आहे ते भयावह आहे. भारतीय समाज झपाट्याने अधोगतीकडे वाटचाल करत आहे. इतर कोणत्याही पोशाखाप्रमाणे हिजाब घालणे ही देखील वैयक्तिक पसंतीची बाब आहे.

    पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसुफझाईनेही याला भयावह म्हटले आहे. तिने ट्विट करून लिहिले की, मुलींना हिजाब घालून कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखणे हे भयानक आहे. कमी किंवा जास्त कपडे घालणाºया महिलांवर आक्षेप घेतला जात आहे.

    The hijab issue gave Pakistanis a chance, now remembered human rights

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे